Join us

VIDEO : ४ चेंडूत घेतल्या ४ विकेट्स, अख्खा सामना फिरलाच होता; पण शेवटच्या चेंडूवर...

Cricket match Viral Video : फलंदाजी संघाला शेवटच्या ६ चेंडूत ७ धावांची आवश्यकता होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:58 IST

Open in App

European Cricket match Viral Video : क्रिकेटच्या खेळात अनेकदा एका षटकाने सामन्याचा निकाल बदलतो. कधी कधी खेळाडू हिरो ठरतो, तर कधी खलनायक ठरतो. दुबईत खेळल्या गेलेल्या एका सामन्यामध्ये असाच प्रकार दिसला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे. एका गोलंदाजाने शेवटचे षटक टाकले. या षटकात सहा चेंडूत सात धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूंवर गोलंदाजाने चार विकेट्स घेतल्या. डबल हॅटट्रिकसह संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र शेवटच्या चेंडूवर एक विचित्र प्रकार घडला आणि क्षणार्धात हिरो ठरू शकणारा गोलंदाज व्हिलन ठरला.

हॅटट्रिकसह घेतल्या चार विकेट्स...

गोलंदाजाने हॅटट्रिक घेतल्यावरही त्याचे सहकारी सामना संपल्यावर दु:खी होते. शेवटच्या षटकात संघाला विजयासाठी ७ धावांची गरज होती. या षटकात गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर फलंदाज कट लागून मागच्या बाजूला झेलबाद झाला. दुसऱ्या चेंडूवर सीमारेषेवर उत्तम झेल टिपण्यात आला. तिसऱ्या चेंडूवर फलंदाज उंच चेंडू मारून किपरकडे झेल देत बाद झाला. गोलंदाजाने हॅटट्रिक घेतली. तो तिथेच थांबला नाही. चौथ्या चेंडूवर त्याने पुन्हा डीप मिड विकेटवर एका फलंदाजाला झेल देण्यास भाग पाडले. चार चेंडूत चार बळी बाद झाल्यावर सामना पूर्णपणे फिरला. पण त्यानंतर पुन्हा एक ट्विस्ट आला.

कहानी में ट्विस्ट

चार चेंडूत चार विकेट घेतल्यामुळे शेवटच्या दोन चेंडूंवर फलंदाजी संघाला विजयासाठी ७ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर केवळ एक धाव काढली गेली. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर षटकाराची आवश्यकता होती. षटकात आधीच ४ बळी घेतलेल्या फलंदाजासाठी १ चेंडूत ६ धावांचा बचाव करणे तसे फारसे कठीण नव्हते. पण कहानी में ट्विस्ट इथेच आला. ३४ धावांची दमदार खेळी केलेला फलंदाज पहिले पाच चेंडू टाकले तेव्हा नॉन स्ट्राइकवर होता. शेवटच्या चेंडूवर तो स्ट्राइकला आला. गोलंदाजाने आपला अनुभव पणाला लावला, पण अखेर नथथिंडगे याने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला.

या षटकारासह फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आणि गोलंदाजी करणारा संघ धक्कादायकरित्या पराभूत झाला.

टॅग्स :सोशल व्हायरलटी-20 क्रिकेट