कसोटीत १५९२१ धावा, वन डेत १८४२६ धावा... वन डेत द्विशतक झळकावणारा पहिला पुरूष क्रिकेटपटू... १०० आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणारा एकमेव फलंदाज... मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) आजही चाहत्यांच्या मनावर आधिराज्य गाजवतोय... २०१३ला वानखेडे स्टेडियमवर अखेरची कसोटी खेळल्यानंतर सचिनची मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पाहायला मिळणार नाही, याचे दुःख अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. पण, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या ( Road Safety World Series) माध्यमातून सचिन पुन्हा मैदानावर आला. आज ४९ वर्षीय सचिनचा तोच जुना अंदाज पाहून चाहते नव्वदीच्या दशकात गेले...
सचिन तेंडुलकरचे लंडनमधील घर पाहिलेत का?; समोरच आहे लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड, See Photo
इंडिया लीजंड्स ( India Legends) संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या सचिनने आज वादळी खेळी केली. इंग्लंड लीजंड्स ( England Legends) संघाच्या गोलंदाजाची धुलाई केली. सचिनने २००च्या स्ट्राईक रेटने खणखणीत फटकेबाजी केली. नमन ओझासह सलामीला आलेल्या सचिनने पहिल्या विकेटसाठी ५.४ षटकांत ६५ धावा जोडल्या. नमन २० धावा करून बाद झाला. सचिनने २० चेंडूंत ४० धावा केल्या. पण, त्याने ३ चौकार व ३ षटकार खेचून अवघ्या ६ चेंडूंत ३० धावा कुटल्या. सुरेश रैना १२ व युसूफ पठाण २७ धावांवर माघारी परतल्याने भारतीय संघाची अवस्था ४ बाद १०८ अशी झाली होती.
त्यानंतर युवराज सिंगने ( Yuvraj Singh) फटकेबाजी केली. १५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारासह त्याने नाबाद ३१ धावा केल्या. इंडिया लीजंड्सने १५ षटकांत ५ बाद १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ३ षटकांत ३६ धावा केल्या होत्या. फिल मस्टर्डने २९ व ख्रिस ट्रेमलेटने नाबाद २४ धावा करून इंग्लंड लीजंड्सला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांना १५ षटकांत ६ बाद १३० धावा करता आल्या. राजेश पवारने १२ धावांत ३ विकेट्स घेतल्या आणि भारताने ४० धावांनी हा सामना जिंकला.