50 Years of Sunny Days लिटल मास्टर सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज अनोखं अर्धशतक पूर्ण केलं. आजच्याच दिवशी १९७१ साली गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल होतं. कसोटी पदार्पणाला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं BCCIनं भारत-इंग्लंड ( India vs England 4th Test) चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गावस्करांना सत्कार केला. लिटल मास्टर यांच्यासाठी सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं भावनिक पोस्ट लिहिली. वाह मित्रांनो, चांगली मैत्री निभावलीत; वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर राहिला नाबाद, वीरूसह नेटिझन्सनी इशांत, सिराजला झोडपलं
गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला. या मालिकेत गावस्करांनी धावांचा पाऊस पाडला . त्यांनी त्या मालिकेत ७७४ धावा चोपल्या. Video : पहिल्या चेंडूवर चौकार, अपर कट अन् षटकारानं पूर्ण केलं अर्धशतक; वीरेंद्र सेहवागचा अंदाज तोच सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट''५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांनी क्रिकेटविश्वात वादळ आणलं होतं. पदार्पणाच्या मालिकेत त्यांनी ७७४ धावा केल्या. ज्याला पाहून मोठं होतो, असा प्रत्येकाचा एक हिरो असतो. भारतानं वेस्टइंडिजमध्ये मालिका जिंकली आणि त्यानंतर इंग्लंडला हरवले. त्यानंतर या खेळानं वेगळी उंची गाठली. मला या खेळाडूसारखं बनायचं होतं आणि त्यादृष्टीने मी प्रयत्न केला. हे कायम राहिल. ते माझ्यासाठी हिरो आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० वर्ष पूर्ण केल्याबद्दल तुमचे अभिनंदन.'' आशिष नेहराचा ऑटोग्राफ अन् क्रिकेटपटू स्टार बनलाच समजा; सोशल मीडियावर 'त्या' फोटोंवरून जोरदार चर्चा कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान गावस्करांचा आहे. त्यांनी १२५ कसोटींत ५१.१२ च्या सरासरीनं १०१२२ धावा केल्या. नाबाद २३६ ही त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि त्यांच्या नावावर ३४ शतकं व ४५ अर्धशतकं आहेत. १०८ वन डे सामन्यांत त्यांनी ३०९२ धावा केल्या असून १ शतक व २७ अर्धशतक झळकावली आहेत. आयपीएलचे सामने मुंबईत होणार; IPL चेअरमन अन् BCCI सदस्यांनी घेतली शरद पवारांची भेट अन्...