Join us  

Babar Azam : बाबर आजमचा वर्ल्ड रेकॉर्ड; सर रिचर्ड्स, विराट यांनाही जे जमले नाही ते केले

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने शुक्रवारी वन डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 5:30 PM

Open in App

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने शुक्रवारी वन डे क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेणारा पाकिस्तान चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजीला मैदानावर आला. या सामन्यात बाबरने मोठ्य विक्रमाला गवसणी घातली. सर विवियन रिचर्ड्स, विराट कोहली या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठ्या नावांनाही वन डे क्रिकेटमध्ये असा विक्रम नोंदवता आला नाही. पाकिस्तानी कर्णधाराने यांच्यासह हाशीम आमला व डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकून जगात लय भारी विक्रमाची नोंद केली.

बाबर आजम वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी इनिंग्जमध्ये ५००० धावा पूर्ण करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. त्याने ९७ इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या नावावर ( १०१ इनिंग्ज) असलेला विक्रम मोडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वन डे क्रिकेटमध्ये १०० हून कमी इनिंग्जमध्ये ५००० धावा करणारा बाबर हा पहिलाच फलंदाज ठरला. सर विवियन रिचर्ड्स व विराट कोहली यांना हा टप्पा ओलांडण्यासाठी ११४ इनिंग्ज, तर डेव्हिड वॉर्नरला ११५ इनिंग्ज खेळाव्या लागल्या होत्या.  

चौथ्या वन डे सामन्यात पाकिस्तानच्या २० षटकांत २ बाद १०६ धावा झाल्या आहेत. फाखर जमान ( १४) व शान मसूद ( ४४) हे सलामीवीर माघारी परतले आहेत. मसूदची विकेट ही वादात अडकली आहे. कर्णधार बाबर २८ आणि मोहम्मद रिझवान ११ धावांवर खेळतोय. 

 

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानन्यूझीलंडविराट कोहली
Open in App