6 ball 6 wickets : ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये चमत्कार घडला, सहा चेंडूंत सहा फलंदाज झाले बाद; Virandeep Singhच्या नावावर भीमपराक्रम, Video 

क्रिकेटमच्या मैदानावर कधी कोणता विक्रम नोंदवला जाईल याचा नेम नाही... इंडियन प्रीमिअर लीगची धामधूम सुरू असताना क्रिकेटच्या मैदानावर एक अशक्यप्राय विक्रमाची नोंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 07:50 PM2022-04-12T19:50:09+5:302022-04-12T19:51:33+5:30

whatsapp join usJoin us
6 ball 6 wickets : Virandeep Singh bowling the final over vs Push Sports Delhi at the Pro Club Championships and took 6 Wickets in 6 Balls, Video  | 6 ball 6 wickets : ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये चमत्कार घडला, सहा चेंडूंत सहा फलंदाज झाले बाद; Virandeep Singhच्या नावावर भीमपराक्रम, Video 

6 ball 6 wickets : ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये चमत्कार घडला, सहा चेंडूंत सहा फलंदाज झाले बाद; Virandeep Singhच्या नावावर भीमपराक्रम, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेटमच्या मैदानावर कधी कोणता विक्रम नोंदवला जाईल याचा नेम नाही... इंडियन प्रीमिअर लीगची धामधूम सुरू असताना क्रिकेटच्या मैदानावर एक अशक्यप्राय विक्रमाची नोंद झाली. Nepal Pro Club Championship स्पर्धेत PUSH SPORTS DELHI विरुद्ध MALAYSIA CLUB XI या सामन्यात असा एक विक्रम नोंदवला गेला, जो क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच नोंदवला गेला असेल. पुश स्पोर्ट्स दिल्लीच्या डावातील 20व्या षटकात मलेशिया क्लब एकादशचा गोलंदाज विरनदीप सिंग ( Virandeep Singh ) याने टाकलेल्या 20व्या षटकात 6 चेंडूत 6 विकेट्स पडल्या. या विक्रमाने सारेच चक्रावले.

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली  संघाने 9 बाद 132 धावा केल्या. 19व्या षटकापर्यंत दिल्लीच्या 4 बाद 132 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर विरऩदीप सिंगने विकेट्सचा सपाटा लावला. त्याने पहिल्याच चेंडूवर दिल्लीचा कर्णधार मृगांक पाठकला ( 39) झेलबाद केले. त्यानंतर इशान पांडे ( 19) रनआऊट झाला. नंतर पुढील पाच चेंडूवर त्याने अऩिंदो नहराय, विशेष सरोहा, जतीन सिंघाल व स्पर्ष यांना बाद केले. अशा प्रकारे 6 चेंडूंत 6 विकेट्स पडण्याची ही पहिलीच वेळ ठरली. विरनदीपने 4 षटकांत 9 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.


मलेशिया एकादश संघाने 17.3 षटकांत 7 विकेट्स राखून हे लक्ष्य पार केले. 

Web Title: 6 ball 6 wickets : Virandeep Singh bowling the final over vs Push Sports Delhi at the Pro Club Championships and took 6 Wickets in 6 Balls, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.