FASTEST T20 hundred - ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल ( Chris Gayle) याच्या नावावर होता. होय होता... गेलने २०१३ मध्ये आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध ३० चेंडूंत शतक झळकावले होते. पण, हा विक्रम आज मोडला गेला. एस्टोनियाच्या साहिल चौहान ( Estonia's Sahil Chauhan ) याने आज २७ चेंडूंत शतक झळकावले. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान शतक ठरले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नामिबियाच्या जॅन निकोल-लॉफी इटनने नेपाळविरुद्ध २०२४ मध्ये ३३ चेंडूंत शतक ठोकले होते.
Cyprus vs Estonia यांच्यातल्या सामन्यात हा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला. प्रथम फलंदाजी करताना सायप्रस संघाने २० षटकांत ७ बाद १९१ धावा उभ्या केल्या. त्यांच्याकडून तरनजीत सिंगने सर्वाधिक ४४ धावा केल्या. जेम्स चिआलोफास ( २७), अकिला कालुगाला ( २०) व चमाल सदून ( २८) यांनीही योगदान दिले. प्रणय घीवाला व अर्सलान गोंडल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात एस्टोनियाने १३ षटकांत ४ बाद १९४ धावा करून विजय मिळवला.