इंडियन प्रीमिअर लीग २०२३च्या लिलावासाठी अनेक फ्रँचायझींनी दिग्गज खेळाडूंना संघातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला अन् लिलावात नव्याने संघबांधणी केली. काहींचा निर्णय योग्य ठरला, तर संघाबाहेर केलेल्या खेळाडूंनी अन्य लीग गाजवून काहींना आश्चर्याचा धक्का दिला. तशीच काहीशी वेळ RCB वर आली असेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सदस्य असलेल्या शेरफाने रुदरफोर्डने दुबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीगमध्ये दमदार फटकेबाजी केली आहे. वेस्ट इंडिजच्या या फलंदाजाने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण याच्या एका षटकात सलग पाच षटकार खेचले.
डेजर्ट व्हायपर्स संघाकडून खेळणाऱ्या रुदरफोर्डने दुबई कॅपिटल्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. या सामन्यात व्हायपर्सने पहिली बॅटिंग केली. रूदरफोर्डने सामन्यात ५० धावा केल्या. त्याने २३ चेंडूत ६ सिक्स खेचले. रूदरफोर्डने १६व्या षटकात ५ षटकार मारले. टीम इंडियाकडून खेळलेला युसूफ पठान गोलंदाजी करत होता. रूदरफोर्डने या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत गगनभेदी षटकार खेचले.
युसूफ पठानच्या या ओव्हरमध्ये व्हायपर्सने ३१ धावा वसूल केल्या. पाच सिक्सच्या मदतीने रूदरफोर्ड २० चेंडूत ४६ धावांवर पोहोचला आणि त्यानंतर त्याने अर्धशतक पूर्ण केलं. युसूफ पठानने या मॅचमध्ये ४ षटकांत ४८ धावा देत एक विकेट घेतली. व्हायपर्सच्या ७ बाद १८२ धावांचा पाठलाग करताना दुबई कॅपिटल्सला ७ बाद १६० धावाच करता आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: 6,6,6,6,6! 5 back to back 6’s in yusuf pathav over, Sherfane Rutherford put up a stunning batting display tonight DVvDC, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.