पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) यानं गुरुवारी नॅशनल ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये खणखणीत शतक मारून विक्रमाची नोंद केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर आजमचा परतलेला फॉर्म हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. २४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या मोहीमेला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे आजमच्या आजच्या शतकानं पाकिस्तानी चाहते सुखावले आहेत.
आजमचे हे ट्वेंटी-२०तील सहावे शतक आहे आणि पाकिस्तानकडून सर्वाधिक ट्वेंटी-२० शतकांचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. ( Babar Azam scores his 6th T20 century) त्यानं रोहित शर्मा व शेन वॉटसन यांच्या विक्रमाची बरोबरी केली, तर विराट कोहलीला ( ५) मागे टाकले. २०१९पासून एकाही फलंदाजाला ट्वेंटी-२०त ४ शतकं झळकावता आलेली नाहीत, परंतु आजमनं हा पराक्रम केला.
आमच्यापेक्षा टीम इंडियावरच असेल अधिक दडपण; पाकिस्तानी कर्णधार बाबरचा दावा
तो म्हणाला, ''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानपेक्षा टीम इंडिया अधिक दडपणाखाली असेल. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी भारतीय खेळाडू बराच काळ एकत्र ट्वेंटी-२० सामने खेळणार नाहीत. ते आयपीएलमध्ये विविध फ्रँचायझीमधून खेळणार आहेत. सध्या ते कसोटी मालिका खेळत आहेत आणि त्यानंतर ते फ्रँचायझी लीगमध्ये व्यग्र होतील. यूएई हे आमच्यासाठी घरचं मैदानच आहे आणि आम्ही १०० टक्के देण्याचा प्रयत्न करू.''
पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी
जाणून घ्या पाकिस्तानचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
२६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. न्यूझीलंड, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
२९ ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
२ नोव्हेंबर - पाकिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबु धाबी, सायंकाळी ७.३० वाजता
७ नोव्हेंबर - पाकिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
Web Title: 6th T20 hundred for Babar Azam, 102* from 58 balls in National T20 Cup, most hundreds by a Pakistan player in T20 format
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.