Join us  

भारताच्या १६ सदस्यीय संघातून लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह यांच्यासह ७ मोठी नावे गायब

IND vs AFG T20I Series :  अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारताचा १६ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 8:26 PM

Open in App

IND vs AFG T20I Series  (Marathi News) :  अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारताचा १६ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये १४ महिन्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांचे पुनरागमन झाले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ च्या उपांत्य फेरीनंतर रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून परतला आहे. रोहित आणि विराट यांचे पुनरागमन झाले असले तरी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि जसप्रीत बुमराहसह एकूण सात खेळाडूंची नावे या संघात दिसत नाहीत.

  रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल यांनी भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सांभाळले होते. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत राहुलसह श्रेयस अय्यरला विश्रांती दिली आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनाही विश्रांती दिली गेली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ट्वेंटी-२०त भारताचा उपकर्णधार असलेल्या रवींद्र जडेजाच्या नावाचाही समावेश नाही. याशिवाय  आफ्रिका दौऱ्यावर ट्वेंटी-२० मालिकेदरम्यान बाकावर बसलेल्या इशान किशनलाही जागा मिळालेली नाही. 

इशानच्या जागी संजू सॅमसनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे टीम इंडियातून माघार घेतलेला दीपक चहरही अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार नाही.  

भारताचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल , रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार

टॅग्स :भारतअफगाणिस्तानजसप्रित बुमराहलोकेश राहुल