Join us

७ म्हातारे! घरात एकच वयस्कर व्यक्ती हवा, ७ असतील तर प्रॉब्लेम होणारच; जडेजाचा थेट रोहित शर्मावर हल्ला

इंग्लंडच्या जोस बटलर व अॅलेक्स हेल्स यांनी एडिलेड ओव्हल मैदानावर भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने १० विकेट्स राखून भारताचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 10:57 IST

Open in App

इंग्लंडच्या जोस बटलर व अॅलेक्स हेल्स यांनी एडिलेड ओव्हल मैदानावर भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने १० विकेट्स राखून भारताचा पराभव केला. २००७नंतर भारतीय संघ यंदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करेल अशीच सर्वांना अपेक्षा होती, परंतु रोहित शर्मा अँड कंपनीला अपयश आले. २०१७मध्ये भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आली नव्हती. २०१३मध्ये भारताने अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. आता भारतीय संघावर टीकेचे बाण सोडले जात आहेत. त्यात भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा ( Ajay Jadeja) याने तर थेट रोहित शर्मावर ( Rohit Sharma) हल्ला चढवला.

वर्ल्ड कप संपला, आता टीम इंडियाची ८ दिवसांत लगेच मालिका; जाणून घ्या कधी, किती वाजता खेळणार

उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहली  ( ५०) व हार्दिक पांड्या ( ६३*) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद १६८ धावा केल्या. जोस बटलर व ॲलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली.  इंग्लंडने १६ षटकांत बिनबाद १७० धावा करून दणदणित विजय मिळवला. भारतावर १० विकेट्स राखून विजय मिलवताना बटलर व हेल्सने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली.    

India T20 Captaincy: वर्ल्ड कप गेला, कर्णधारपदही जाणार! रोहित शर्माच्या बाबतीत BCCI टफ कॉल घेणार; लवकरच मोठी घोषणा

अजय जडेजा म्हणाला, मी काही बोललो तर रोहितला वाईट वाटेल. एखाद्या कर्णधाराला जर टीम उभी करायची आहे, तर त्याने वर्षभर त्या खेळाडूंसह राहायला हवं. मागील वर्षभरात रोहितने संघासोबत किती दौरे केले. मी हे आधीही सांगितले आहे. घरात एकच वयस्कर व्यक्ती असायला हवा, ७ जणं असतील तर समस्या निर्माण होईलच. भारताच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. रोहित पूर्ण स्पर्धेत अपयशी ठरला. त्याने १९.३३च्या सरासरीने ११६ धावाच केल्या.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App