ipl 2023 time table । मुंबई : जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरूवात 31 मार्चपासून होत आहे. आगामी हंगामातील पहिला सामना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पांड्याच्या गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. मात्र, या स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच काही स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत.
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. खरं तर बुमराह आगामी आयपीएलला देखील मुकणार आहे. याशिवाय झाय रिचर्डसन देखील आयपीएलमधून बाहेर झाल्याने मुंबईच्या संघाला मोठा झटका बसला आहे. तसेच दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार रिषभ पंत विश्रांती घेत आहे. याशिवाय पंजाब किंग्जचा सलामीवीर जॉनी बेयरस्टो, आरसीबीचा वील जॅक्स, सीएसकेचा काइल जेमिसन आणि राजस्थान रॉयल्सचा प्रमुख गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा देखील दुखापतीमुळे IPLला मुकणार आहे.
IPL 2023 मधून बाहेर झालेले खेळाडू
- जसप्रीत बुमराह - मुंबई इंडियन्स
- झाय रिचर्डसन - मुंबई इंडियन्स
- रिषभ पंत - दिल्ली कॅपिटल्स
- जॉनी बेयरस्टो - पंजाब किंग्ज
- विल जॅक्स - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- काइल जेमिसन - चेन्नई सुपर किंग्ज
- प्रसिद्ध कृष्णा - राजस्थान रॉयल्स
3 जणांच्या खेळण्यावर संभ्रम
- मुकेश चौधरी - चेन्नई सुपर किंग्ज
- मोहसीन खान - लखनौ सुपर जायंट्स
- श्रेयस अय्यर - कोलकाता नाईट रायडर्स
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"