IPL 2022 Final: टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी... पाहा आकडेवारी काय सांगते!

टॉस जिंकण्याच्या बाबतीत राजस्थानच्या संजू सॅमसनची आकडेवारी खूप खराब आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 05:30 PM2022-05-29T17:30:59+5:302022-05-29T17:31:50+5:30

whatsapp join usJoin us
7 wins in 11 finals as IPL Finals results favour team batting first see some Key numbers you need to know ahead of IPL 2022 final | IPL 2022 Final: टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी... पाहा आकडेवारी काय सांगते!

IPL 2022 Final: टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी... पाहा आकडेवारी काय सांगते!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Toss Batting First or Bowling, IPL Final 2022 : विजेतेपदासाठी यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम दोन संघ म्हणजेच गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज लढत होणार आहे. समारोप सोहळा झाल्यानंतर ८ वाजता हा सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कसून तयारी केली आहे. धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्यात गुजरातच्या संघाने ८ पैकी ७ सामने जिंकले आहेत. तर राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ सामने आपल्या नावे केले आहेत. मात्र, अहमदाबादच्या पिचवर दुसरी फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मिळतो असं क्वालिफायर-२ च्या सामन्यात दिसून आलं. अशा परिस्थितीत टॉस जिंकून कर्णधाराने प्रथम फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी... याबद्दल जाणून घेऊया.

आतापर्यंत IPL च्या अंतिम फेरीच्या सामन्यात ९ वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ विजेता ठरला आहे तर ५ वेळा आव्हानाचा पाठलाग करणारा संघ विजेता झाला आहे. फायनलचे दडपण असल्याने आव्हानाचा पाठलाग करणं कठीण होतं या मानसिकतेतून बरेचदा नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या आकडेवारी शिवाय, आणखी एक मजेशीर आकडेवारी म्हणजे, २०११ पासून IPLच्या साखळी फेरीत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला ११ पैकी ७ वेळा विजेतेपद मिळाले आहे. २०११ ला प्ले-ऑफ पद्धत सुरू झाली, तेव्हापासून हा बदल झाल्याचे दिसले आहे.

फायनलमध्ये बटलरला मोठ्या विक्रमाची संधी

जोस बटलरने क्वालिफायर-२ च्या सामन्यात बंगलोर विरूद्ध १०६ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे प्ले-ऑफ फेरीतील वॉर्नरचा एक विक्रम त्याने मोडला. प्ले-ऑफच्या फेरीत १९० धावांचा वॉर्नरचा विक्रम होता. बटलरने १९४ धावा केल्या. मात्र वॉर्नरचा आणखी एक मोठा विक्रम बटरलच्या दृष्टीपथात आहे. जोस बटलरला वॉर्नरचा तो मोठा विक्रम तोडण्यासाठी २५ धावांची आवश्यकता आहे. वॉर्नरने IPL 2016 मध्ये हैदराबाद संघाकडून खेळताना एका हंगामात ८४८ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडण्याची संधी बटलरकडे आहे.

Web Title: 7 wins in 11 finals as IPL Finals results favour team batting first see some Key numbers you need to know ahead of IPL 2022 final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.