राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली. त्यापैकी एका योजनेचं भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं कौतुक केलं आहे. त्या ट्विट्सवर कमेंट करताना रहाणेनं आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं.
राज्य सरकरानं जाहिर केलेल्या निर्णयात बीच शॅक्स प्रकल्पाचा समावेश आहे. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स उभारण्यासंदर्भातील धोरणाला राज्य सरकामे मान्यता दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर आणि तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली आणि दिवेआगार तर पालघर जिल्ह्यातील केळवा आणि बोर्डी या आठ किनाऱ्यांवर पायलट प्रोजेक्ट म्हणून बीच शॅक्स उभारण्यात येतील, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.
पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह