India vs West Indies : वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ट्वेंटी-२० मालिकेसाठी अहमदाबाद येथे दाखल झालेल्या भारतीय संघातील 8 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बीसीसीआयनं याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. अपडेट्स माहितीनुसार या ८ पैकी ३ जणं ही सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत.
''दोन्ही संघातील खेळाडूंना खबरदारीचा उपाय म्हणून विलगिकरणात जाण्यास सांगितले आहे. भारताच्या ताफ्यातील तीन खेळाडू व सपोर्ट स्टाफ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तेही विलगिकरणात आहेत. या मालिकेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ती होईल. गरज वाटल्यास आम्ही बदली खेळाडू बोलवू,'' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेतील तीन वन डे सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील, तर तीन ट्वेंटी-२० सामने कोलकाताच्या ईडन गार्डनवर होतील.सुधारीत वेळापत्रकानुसार ६, ९, ११ फेब्रुवारीला अहमदाबाद येथे होतील, तर १६, १८ व २० फेब्रुवारीला कोलकातात ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येतील.
भारताचा टी-२० संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.
एकदिवसीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.