Join us  

9.4 ओव्हर, 0 रन, 8 विकेट; श्रीलंकेच्या 10 वर्षीय 'मुरलीधरन'च्या गोलंदाजीने क्रिकेट विश्वात खळबळ

Selvasekaran Rishiyudhan: श्रीलंकेच्या क्रिकेट विश्वात एका मुलाने खळबळ उडवून दिली आहे. अनेकजण याची तुलना मुथय्या मुरलीधरनशी करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 2:33 PM

Open in App

Selvasekaran Rishiyudhan cricket Srilanka : श्रीलंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचे नाव जगातील महान फिरकीपटूंमध्ये घेतले जाते. अलीकडेच बायोपिक सिनेमामुळे मुरलीधरन चर्चेत आला होता. दरम्यान, आता श्रीलंकेतील अजून एका फिरकीपटूची चर्चा होत आहे. सेल्वासेकरन ऋषियुधन (Selvasekaran Rishiyudhan) नावाचा हा मुलगा अचानक श्रीलंकेच्या शालेय क्रिकेटमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. याचे कारण म्हणजे, त्याने शालेय क्रिकेटमध्ये केलेली अप्रतिम गोलंदाजी आहे.

हिंदू कॉलेज बंबालापिटियातील उजव्या हाताचा ऑफ-स्पिनर सेल्वासेकरन ऋषियुधनने एमडीएचविरोधात एकही धाव न देता चक्क आठ विकेट घेतल्या. सेल्वासेकरनने 13 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जयवर्धने एमव्ही बथरमुल्ला शाळेविरुद्ध ही चमकदार कामगिरी केली. 10 वर्षीय सेल्वासेकरनने 9.4 षटकांत एकही धाव न देता 8 विकेट घेतल्या. 

त्याच्या या घातक गोलंदाजीमुळे हिंदू कॉलेज बंबालापिटियाने एम.डी.एच. जयवर्धनेने एमव्ही बथरमुल्लाविरुद्ध मोठा विजय मिळवला. सेल्वासेकरनची गोलंदाजी पाहून तिथे उपस्थित सर्वलोक चकीत झाले. तसेच, अनेकांनी त्याची तुलना श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनशी केली आहे.

मुरलीधरनची कामगिरीमुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये 800 बळी घेतले आहेत. मुरलीची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 51 धावांत 9 बळी. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये मुरलीधरनच्या नावे 534 आणि टी-20 फॉरमॅटमध्ये 13 विकेट आहेत. मुरलीधरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1300 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. 

टॅग्स :श्रीलंकाऑफ द फिल्डआंतरराष्ट्रीयसोशल मीडियाशाळा