नवी दिल्ली : आयपीएल २०२३ चे बिगुल वाजले आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी २३ डिसेंबरला कोचीमध्ये मिनी लिलाव पार पडणार आहे. लिलावासाठी ९९१ खेळाडूंनी नोंदणी केली असून त्यात ७१४ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याला दुजोरा दिला आहे.
१४ देशांतील खेळाडूंनी नोंदणी केली आहे. खेळाडूंच्या यादीत १८५ कॅप्ड, ७८६ अनकॅप्ड आणि २० असोसिएट खेळाडूंचा समावेश आहे. २७७ परदेशी खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ५७ क्रिकेटपटू आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या ५२ खेळाडूंचा समावेश आहे. मार्च २०२३ अखेरपासून यंदाचे आयपीएल सत्र सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दीड कोटी बेस प्राइस असलेले खेळाडू
शॉन ॲबोट, रिले मेरेडिथ, झ्ये रिचर्डसन, ॲडम झम्पा, साकिब अल हसन, हॅरी ब्रूक, विल जॅक्स, डेविड मलान, जेसन रॉय, शेरफेन रुदरफोर्ड.
एक कोटी बेस प्राइस असलेले खेळाडू
मयंक अग्रवाल, केदार जाधव, मनीष पांडे, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, मोइझेस हेन्रिक्स, अँड्र्यू टाय, ज्यो रूट, ल्यूक वुड, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, मार्टिन गुप्टिल, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेनरिक क्लासेन, तबरेझ शम्सी, कुसाल परेरा, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, शाय होप, अकिल हुसेन, डेव्हिड विसे.
दोन कोटींच्या बेस प्राइसमध्ये एकही भारतीय नाही
लिलावासाठी ज्या नामवंत खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत त्यात बेन स्टोक्स, कॅमेरून ग्रीन, सॅम करन या खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांची मूळ किंमत (बेस प्राईस) प्रत्येकी दाेन कोटी रुपये आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दाेन कोटी आणि दीड कोटींच्या बेस प्राइसमध्ये एकाही भारतीय खेळाडूचे नाव नाही. मयंक अग्रवालसह काही खेळाडूंची नावे एक कोटीच्या बेस प्राइसमध्ये आहेत.
दोन कोटी बेस प्राइस असलेले खेळाडू
नॅथन कुल्टर- नाईल, कॅमेरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, ख्रिस लिन, टॉम बॅंटन, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, जेमी ओव्हरटन, क्रेग ओव्हरटन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, ॲडम मिल्ने, जिमी नीशाम, केन विल्यमसन, रिले रोसो, रॅसी व्हॅन डर दुसेन, अँजेलो मॅथ्यूज, निकोलस पूरन, जेसन होल्डर.
१४ देशांचे खेळाडू
वेस्ट इंडीजचे ३३, इंग्लंडचे ३१, न्यूझीलंडचे २७, श्रीलंकेचे २३, अफगाणिस्तानचे १४, आयर्लंडचे आठ, नेदरलँडचे सात, बांगलादेशचे सहा, यूएईचे सहा, झिम्बाब्वेचे सहा, नामिबियाचे पाच तर स्कॉटलंडच्या दाेन खेळाडूंचा समावेश आहे.
Web Title: 991 players in mini auction of IPL 2023; Including 714 Indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.