इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे आणि लखनौच्या खेळपट्टीवर धावांचा दुष्काळ पडलेला दिसतोय... याआधीच्या सामन्यातही गुजरात टायटन्सविरुद्ध परिस्थिती अशीच होती. पण, तेच दुसरीकडे कुवैत येथे सुरू असलेल्या KCC ट्वेंटी-२० ट्रॉफीत एका षटकात ४६ धावा कुटल्या गेल्या आहेत. NCM Investments विरुद्ध Tally CC अशा दोन संघांमध्ये ही मॅच सुरू आहे.
प्रथम फलंदाजी करताना NCM ने २० षटकांत ६ बाद २८२ धावा चोपल्या आणि CC संघाच्या १५व्या षटकांत हरमन सिंगच्या एका षटकात वासुदेव दात्ला याने ४६ धावा कुटल्या. पहिला चेंडू नो बॉल होता आणि त्यावर षटकार गेला. त्यानंतर बाईजच्या चार धावा मिळाल्या. नंतर षटकार, नो बॉलवर आणखी एक षटकार लागले. त्यापाठोपाठ षटकाराची हॅटट्रीक साजरी केली गेली आणि अखेरच्या चेंडूवर चौकार मारला. 7nb, 4b, 6,7nb,6,6,6,4 अशा धावा आल्या. वासुदेवने ४१ चेंडूंत ४ चौकार व ११ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. अदनान इद्रेस ( ५९) व डिजू ( ९०) यांनीही चांगली फटकेबाजी केली.