४९ चेंडूंत १११ धावा! रग्बीपटू आता क्रिकेटचं मैदान गाजवणार; आंतरराष्ट्रीय संघात पटकावले स्थान

रग्बीपटू जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरला त्याने ४९ चेंडूंत १११ धावांची वादळी खेळी केली आणि आता थेट त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 01:19 PM2022-12-21T13:19:33+5:302022-12-21T13:20:59+5:30

whatsapp join usJoin us
A 49-ball 111, the international cricketer is the rugby player, Ross Adair is in the Ireland squad for the tour of Zimbabwe  | ४९ चेंडूंत १११ धावा! रग्बीपटू आता क्रिकेटचं मैदान गाजवणार; आंतरराष्ट्रीय संघात पटकावले स्थान

४९ चेंडूंत १११ धावा! रग्बीपटू आता क्रिकेटचं मैदान गाजवणार; आंतरराष्ट्रीय संघात पटकावले स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

प्रतिभा काही केल्या लपून राहत नाही... रग्बीपटू जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरला त्याने ४९ चेंडूंत १११ धावांची वादळी खेळी केली आणि आता थेट त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. या रग्बीपटूने पाच महिन्यांपूर्वी ही स्फोटक खेळी केली होती आणि आता त्याची आयर्लंडच्या संघात निवड झाली आहे. रॉस एडयर असे या माजी रग्बीपटूचे नाव आहे. आयर्लंडनेझिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात रॉसची निवड केली आहे आणि जानेवारीत ही मालिका होणार आहे.

रॉस एडयरने रग्बीनंतर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि नॉर्दन नाईट्सकडून खेळायला लागला. त्याने २०२१मध्ये या संघाकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. फलंदाज आणि डावखुरा फिरकीपटू असलेल्या रॉस हा आयर्लंडचा क्रिकेटपटू मार्क एडयरचा भाऊ आहे. 

आयर्लंड संघात स्थान मिळण्यासाठी रॉसची ४९ चेंडूंतील १११ धावांची खेळी महत्त्वाची ठरली. ६५ मिनिटांच्या या खेळीत त्याने ८ षटकार व १२ चौकार खेचले होते. रॉसकडे १५ ट्वेंटी-२० सामन्यांचा अनुभव आहे आणि त्यात १ शतक व १ अर्धशतकासह ३०१ धावा आहेत. त्याशिवाय त्याने ७ लिस्ट ए क्रिकेट सामने खेळले आहेत. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो प्रथमच उतरणार आहे.

 

Web Title: A 49-ball 111, the international cricketer is the rugby player, Ross Adair is in the Ireland squad for the tour of Zimbabwe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.