हिटमॅनची जबरा फॅन! Rohit Sharma ला भेटून तिनं केलं असं काही की जिंकली मनं, Video

Rohit Sharma: रोहित शर्मा आणि त्याच्या चाहतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 12:32 PM2024-04-07T12:32:08+5:302024-04-07T12:32:54+5:30

whatsapp join usJoin us
A big fan of Hitman rohit sharma After meeting mumbai indians former captain she did something that won her heart | हिटमॅनची जबरा फॅन! Rohit Sharma ला भेटून तिनं केलं असं काही की जिंकली मनं, Video

हिटमॅनची जबरा फॅन! Rohit Sharma ला भेटून तिनं केलं असं काही की जिंकली मनं, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Video: क्रिकेटची भारतात भलतीच क्रेझ असून यामुळे क्रिकेटपटू प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. प्रत्येक खेळाडूचे लाखो चाहते आपल्या आवडत्या शिलेदाराची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. क्रिकेट म्हणजे भारतात जणू काही एक धर्मच. सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे.  (IPL 2024 News) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात आतापर्यंत साजेशी देखील कामगिरी करता आली नाही. मुंबईने सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशी लढत होत आहे. (Rohit Sharma) 

मुंबई आपला दुसरा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळत आहे. वानखेडे म्हणजे मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माचा 'गड' असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. रोहितची झलक पाहण्यासाठी मुंबईकर आतुर असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे. हिटमॅनची एक चाहती त्याला पाहताच त्याच्या दिशेने गेली अन् त्याच्या पाया पडली. चाहतीने आणलेल्या पोस्टरवर ऑटोग्राफ देऊन तिच्यासोबत एक फोटो काढला. 

रोहित आणि तिच्या या चाहतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते कमेंटच्या माध्यमातून यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मुंबईला आपल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ तीन सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याचे दिसले. जसप्रीत बुमराहला पहिले षटक का दिले जात नाही असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात यजमान हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा करून इतिहास रचला. 

Web Title: A big fan of Hitman rohit sharma After meeting mumbai indians former captain she did something that won her heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.