मुंबई - मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी पान, किंवा सोनेरी क्षण सचिनचे चाहते जगभरात विखुलरलेले आहेत. भारतात क्रिकेट म्हणजे सचिन आणि सचिन म्हणजेच क्रिकेट असा काळ होता. एकदिवसीय सामन्यांत, किंवा कसोटी मालिकेत सचिनची फलंदाजी पाहण्यासाठी रस्ते सामसून पडायचे. भारतीय संघाला सामना जिंकून देणारा फलंदाज म्हणजे सचिन तेंडुलकर अशीच मानसिकता क्रिकेट प्रेमींची बनली आहे. त्यामुळेच, सचिनचा फॅन फॉलोविंग किंवा त्याच्यावर अफलातून प्रेम करणारा एक वेगळाच वर्ग आहे. सचिनही अनेकदा आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असतो. नुकतेच, एका चाहत्याने सचिनचा फोटो आपल्या हातावर टॅटू म्हणून गोंदला आहे.
सचिन तेंडुलकरने चाहत्याने हातावर गोंदलेला टॅटू शेअर करत त्याला १० पैकी १० गुण दिले आहेत. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी केबीसीमध्ये हॉट सीटवर बसलेल्या एका चाहत्याने सचिन तेंडुलकरचा आपण जबरा फॅन असल्याचं बिग बी अमिताभ बच्चन यांना सांगितलं होतं. त्यावेळी, सचिन तेंडुलकरनेही त्यांना एकदा भेट देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, सचिनने आपल्या चाहत्याला भेटही दिली. त्यावेळी, या चाहत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
आता, सचिनने आपल्या चाहत्याच्या ट्विटला रिप्लाय केला आहे. #Asksachin या हॅशटॅगखाली सचिनने चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी, एका चाहत्याने आपल्या हातावर सचिनचा एक टॅटू कोरल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, सचिनची बेस्ट पोजीशन त्याने हातावर कोरली आहे. देवा, माझा हा टॅटू पाहा...
पाकिस्तानिवरुद्धची तुझी ही बेस्ट पोझिशन माझी कायमस्वरुपी फेव्हरेट राहिली आहे. तुझ्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मी ही माझ्या हातावर टॅटू स्वरुपात कोरली आहे. माझं हे तुझ्याबद्दलचं प्रेम आहे, असं या चाहत्यानं म्हटलं आहे. चाहत्याच्या या ट्विटला सचिनने रिप्लाय दिलाय. त्यामध्ये, १० पैकी १० गुण देऊन सचिनने सिवान नावाच्या चाहत्याबद्दल प्रेम व्यक्त केलंय. दरम्यान, सचिन तेंडलुकरचा २४ एप्रिल रोजी वाढदिवस साजरा होत आहे, त्या पार्श्वभूीवर चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Web Title: A birthday gift to Sachin Tendulkar from a fan, 10 out of 10 from the god of cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.