Join us  

SRH vs GT सामन्यात हाताला दुखापत असतानाही चीअरलीडरनं केलं परफॉर्म; चाहत्यांनी व्यक्त केला संताप

SRH vs GT : सोमवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 4:20 PM

Open in App

Cheerleader Performs with Arm Injury : अहमदाबाद : सोमवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. या सामन्यादरम्यान एका चीअरलीडरच्या हाताला दुखापत झाली असतानाही ती परफॉर्म करताना दिसली. हे 'समर्पण आहे की कर्तव्य' असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर काही नेटकऱ्यांना या फोटोचा दाखला देत बीसीसीआय आणि आयपीएलच्या व्यवस्थापनावर टीका केली आहे.

दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात शुबमन गिलने सनरायझर्स हैदराबादविरूद्ध शानदार शतक झळकावले. खरं तर आयपीएल २०२३ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ १८ गुणांसह आताच्या घडीला क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. गुजरातच्या संघाकडून यंदाच्या हंगामात शतक ठोकणारा गिल हा पहिला खेळाडू ठरला आहे. पण सामन्यादरम्यान चीअरलीडरचे अशा अवस्थेतील सादरीकरण पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गुजरातची प्लेऑफमध्ये झडक काल सनरायझर्स हैदराबादला नमवून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने शुबमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर (१०१) निर्धारित २० षटकांत ९ बाद १८८ धावा केल्या. १८९ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या फलंदाजांना घाम फुटला अन् संघ केवळ १५४ धावा करू शकला. गतविजेत्यांनी ३४ धावांनी मोठा विजय मिळवून प्लेऑफमध्ये धडक मारली. 

 

  

टॅग्स :आयपीएल २०२३गुजरात टायटन्ससनरायझर्स हैदराबादनरेंद्र मोदी स्टेडियमबीसीसीआयट्रोल
Open in App