Join us  

Umran Malik, Team India: उमरान मलिकची जागा घेणार केवळ ३ सामने खेळलेला क्रिकेटर, संघात मोठा बदल

न्यूझीलंड दौऱ्यासाठी उमरान मलिकची टीम इंडियामध्ये निवड झाली. त्याच्यासंबंधी आता महत्त्वाची अपडेट आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 8:29 PM

Open in App

Umran Malik, Team India: भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची नुकतीच न्यूझीलंड दौऱ्यासाठी (IND vs NZ Tour) निवड झाली आहे. पण, आता त्याच्याशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) संघात आता केवळ ३ सामने खेळणाऱ्या खेळाडूला स्थान देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. उमरान मलिकच्या जागी आलेल्या खेळाडूचे नाव आकाश चौधरी आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी जम्मू-काश्मीरच्या संघात हा मोठा बदल करण्यात आला आहे. १२ नोव्हेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी खेळली जाणार आहे. पण टीम इंडियामध्ये उमरान मलिकची निवड झाल्यामुळे तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीर संघाचा भाग होऊ शकणार नाही. त्याला भारतीय संघात सामील व्हायचे आहे.

उमरान मलिकच्या जागी आकाश चौधरी

टीम इंडियाला वन डे आणि टी२० मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. हा दौरा टी२० विश्वचषक २०२२ नंतर सुरू होईल. या दोन मालिकेसाठी उमरान मलिक न्यूझीलंड दौऱ्यावर असणार आहे. उमरान भारतीय संघात सामील झाल्यानंतर, त्याच्या जागी आकाश चौधरीने जम्मू-काश्मीर संघात स्थान मिळवले आहे. त्याने आतापर्यंत फक्त ३ सामने खेळले आहेत. आकाश चौधरीने तिन्ही सामने रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीरकडून खेळले आहेत. या ३ सामन्यात त्याने ९८ धावा केल्या आहेत आणि ३ बळी घेतले आहेत. आता आकाश चौधरीला मर्यादित षटकांमध्ये पहिला सामना खेळायचा आहे. त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये संधी मिळाल्यास तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे.

उमरानबाबत JKCAकडून विधान

जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशन एक निवेदन जारी करून म्हटले आहे, "न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये उमरान मलिकची निवड झाल्यानंतर, अध्यक्ष विद्या भास्कर यांच्या नेतृत्वाखालील JKCAने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आकाश चौधरीचे नाव २०२२-२३ पर्यंत निश्चित केले आहे. उपसमितीने आमचा प्रस्ताव स्वीकारला असून १६ सदस्यीय J&K संघात आकाश चौधरीचे नाव दिले आहे.”

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघजम्मू-काश्मीरन्यूझीलंड
Open in App