Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:हार्दिकचा विदेशातही डंका! अफगाणिस्तानच्या फॅन्सने चक्क टीव्हीच्या स्क्रीनवरून पांड्याला केला किस

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारतीय संघाने विजय मिळवताच अफगाणिस्तानच्या चाहत्याचे हार्दिक पांड्याचा किस घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 02:15 PM2022-08-29T14:15:53+5:302022-08-29T14:16:02+5:30

whatsapp join usJoin us
A fan from Afghanistan kissed Hardik Pandya after India won the match between India and Pakistan | Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:हार्दिकचा विदेशातही डंका! अफगाणिस्तानच्या फॅन्सने चक्क टीव्हीच्या स्क्रीनवरून पांड्याला केला किस

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:हार्दिकचा विदेशातही डंका! अफगाणिस्तानच्या फॅन्सने चक्क टीव्हीच्या स्क्रीनवरून पांड्याला केला किस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Pakistan । नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने होते. चुरशीच्या लढतीत अखेर भारतीय संघाने विजय मिळवून टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाबाद 35 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. दोन्हीही संघांनी शानदार क्रिकेट खेळून चाहत्यांचे मनोरंजन केले मात्र हार्दिकच्या मॅच विनिंग खेळीने सर्वांनाच आकर्षित केले. त्याने अखेरच्या 3 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना विजयी षटकार ठोकून प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारली. 

दरम्यान, भारताच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाचा सलामीवीर फलंदाज के.एल राहुल आपल्या पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. त्याला टी-२० मध्ये पदार्पण केलेल्या नसीम शाहने बाद केले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. किंग कोहलीने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करून ३५ धावांची साजेशी खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने प्रभावशाली २९ चेंडूंत ३५ धावांची खेळी केली, तर विराट कोहली (३५), रोहित शर्मा (१२), सूर्यकुमार यादव (१८) आणि हार्दिक पांड्याने नाबाद ३३ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. 

हार्दिक पांड्या मागील आशिया चषकाच्या सत्रातून दुखापतीच्या कारणास्तव बाहेर झाला होता. मात्र रविवारच्या सामन्यात पांड्याने 3 बळी पटकावून 35 धावांचे अष्टपैलू कामगिरी करून सर्व चाहत्यांचे मन जिंकले. पांड्यामुळेच भारताला विजय मिळाल्याने त्याने सर्वांच्या मनात जागा केली आहे. या चाहत्यांमध्ये एका अफगाणिस्तानच्या चाहत्याचा देखील समावेश आहे, लक्षणीय बाब म्हणजे अफगाणिस्तानच्या या जबरा फॅनने चक्क टीव्हीच्या स्क्रीनवरून हार्दिक पांड्याला किस केला आहे. सध्या या अनोख्या किसिंगचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

टीव्हीवरून घेतला हार्दिकचा किस 
"आमच्या सर्व बांधवांचे अभिनंदन. भारत आणि अफगाणिस्तानमधील लोक हा विजय एकमेकांसोबत साजरा करत आहोत", अशा आशयाचे कॅप्शन लिहून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अफगाणिस्तानमधील लोक भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहत आहेत. सामन्याच्या अखेरीस हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकताच एका चाहत्याने चक्क टीव्हीवरून पांड्याला किस केला.

 

Web Title: A fan from Afghanistan kissed Hardik Pandya after India won the match between India and Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.