PSL 2023: ना बाबर ना आफ्रिदी, PSL मध्ये रोहितचा 'जलवा', पाकिस्तानी चाहता हिटमॅनच्या 'प्रेमात'

Pakistan Super League 2023: सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 04:22 PM2023-02-16T16:22:09+5:302023-02-16T16:22:49+5:30

whatsapp join usJoin us
A fan spots Rohit Sharma's poster during the Pakistan Super League match between Multan Sultans and Quetta Gladiators   | PSL 2023: ना बाबर ना आफ्रिदी, PSL मध्ये रोहितचा 'जलवा', पाकिस्तानी चाहता हिटमॅनच्या 'प्रेमात'

PSL 2023: ना बाबर ना आफ्रिदी, PSL मध्ये रोहितचा 'जलवा', पाकिस्तानी चाहता हिटमॅनच्या 'प्रेमात'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

rohit sharma । नवी दिल्ली : पाकिस्तान सुपर लीग 2023 (Pakistan Super League 2023) मध्ये बुधवारी मुल्तान सुल्तान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात मुल्तान स्टेडियमवर सामना पार पडला. हा सामना यजमान मुल्तानच्या संघाने जिंकला. खरं तर मोहम्मद रिझवानच्या संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीच्या लाहोर कलंदर्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. कालच्या सामन्यात एका चाहत्याने सर्वांचे लक्ष वेधले. काल स्टेडियममध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचापाकिस्तानी चाहता पाहायला मिळाला. पाकिस्तानातील रोहित शर्माच्या चाहत्याने स्टेडियममध्ये रोहित शर्माचे पोस्टर झळकावले, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे जगभरात चाहते आहेत. दरम्यान, पाकिस्तानमध्ये सध्या देशांतर्गत पीएसएल (PSL) लीग सुरू आहे. काल पीएसएलमधील मुल्तान सुल्तान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या एका चाहत्याने त्याचे पोस्टर झळकावले. त्यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  

पाकिस्तानी चाहता हिटमॅनच्या 'प्रेमात' 

मुल्तान सुल्तान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, इहसानुल्लाहने त्याच्या दुसऱ्या पीएसएल सामन्यातच 5 बळी घेत वर्चस्व गाजवले. या सामन्यात त्याने चार षटकात केवळ 12 धावा देत 5 बळी पटकावले. दुसरीकडे, सुल्तानचे गोलंदाज सुरुवातीपासूनच क्वेटाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसले आणि त्यांना केवळ 110 धावांत गुंडाळले. या सामन्यात मोहम्मद रिझवानच्या संघाला विजयासाठी 20 षटकांत केवळ 111 धावांची आवश्यकता होती. 111 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुल्तानच्या संघाने पहिला गडी तीन धावांत गमावला. यानंतर मोहम्मद रिझवान आणि रिले रोसो यांच्यात विजयी भागीदारी झाली. यादरम्यान रिलेने 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने अवघ्या 42 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी केली आणि संघाला 9 गडी राखून विजय मिळवून दिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: A fan spots Rohit Sharma's poster during the Pakistan Super League match between Multan Sultans and Quetta Gladiators  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.