विदेशी खेळाडू ‘इम्पॅक्ट प्लेयर’ बनू शकणार नाही; आयपीएलसाठी BCCI चा नवा नियम

संघ सामन्याच्या मध्ये त्याच्या ‘इम्पॅक्ट प्लेयर’ला बोलावून त्याला फलंदाजी किंवा गोलंदाजी करू देऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 06:05 AM2022-12-10T06:05:00+5:302022-12-10T06:05:24+5:30

whatsapp join usJoin us
A foreign player will not be able to become an 'Impact Player'; BCCI's New Rules for IPL | विदेशी खेळाडू ‘इम्पॅक्ट प्लेयर’ बनू शकणार नाही; आयपीएलसाठी BCCI चा नवा नियम

विदेशी खेळाडू ‘इम्पॅक्ट प्लेयर’ बनू शकणार नाही; आयपीएलसाठी BCCI चा नवा नियम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ (प्रभावशाली खेळाडू) नियम लागू करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या बिग बॅश लीगमध्येही त्याची अंमलबजावणी झाली. हा नियम त्या लीगमध्ये खूप महत्त्वाचा ठरला. इम्पॅक्ट प्लेयरने अनेक सामन्यांना कलाटणी दिली. हा नियम आयपीएलमध्येही महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने शुक्रवारी यात सुधारणा केली.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना सांगितले की, कोणत्याही विदेशी खेळाडूला प्रभावशाली खेळाडू बनविता येणार नाही. याचा अर्थ, जेव्हा कर्णधार प्लेइंग इलेव्हनसोबत चार पर्यायी खेळाडूंची नावे देईल, तेव्हा ते सर्व भारतीय असले पाहिजेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त चार विदेशी खेळाडू खेळू शकतात. या नियमात कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच, भारतीय खेळाडूच्या जागी विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येऊ शकत नाही, तसेच विदेशी खेळाडूच्या जागी सब्स्टिट्यूट खेळाडू म्हणून खेळू शकत नाही. 

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमांतर्गत, कर्णधार नाणेफेकीदरम्यान प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट नसलेल्या खेळाडूला (भारतीय) बाहेरून खेळविण्यास सक्षम असतील. तो इलेव्हनमधील कोणत्याही एका खेळाडूच्या जागी खेळू शकेल. तो ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून ओळखला जाईल. कर्णधाराला नाणेफेकीदरम्यान खेळणाऱ्या ११ खेळाडूंच्या नावासह अतिरिक्त चार खेळाडूंची (भारतीय) नावे द्यावी लागतील. या चार खेळाडूंपैकी कोणताही एक ‘इम्पॅक्ट प्लेयर’ होऊ शकतो.

संघ सामन्याच्या मध्ये त्याच्या ‘इम्पॅक्ट प्लेयर’ला बोलावून त्याला फलंदाजी किंवा गोलंदाजी करू देऊ शकतात. संघ डावाच्या १४व्या षटकानंतर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ला  बोलावू शकत नाही. जर त्यांना बदल करायचे असतील, तर ते त्यापूर्वी करू शकतात. इम्पॅक्ट प्लेअरच्या बदल्यात वगळलेला खेळाडू संपूर्ण सामन्यात परत येऊ शकणार नाही. तो क्रिकेटमध्ये बदली क्षेत्ररक्षक म्हणूनही खेळू शकत नाही.
प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यापूर्वी कर्णधाराने ऑनफिल्ड अंपायर किंवा चौथ्या अंपायरला कळवावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत, सामना २० षटकांवरून १० षटकांचा केल्यास, ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा नियम संपुष्टात येईल, म्हणजेच  प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होणार नाही.

Web Title: A foreign player will not be able to become an 'Impact Player'; BCCI's New Rules for IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.