Yuzvendra Chahal reacts to rumors of trouble in his relationship with wife Dhanashree - भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यातील संबंध तुटल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. चहलने त्याच्या इंस्टा स्टोरीवर न्यू लाईफ लोडिंग असा मॅसेज पोस्ट केला होता, त्याचवेळी धनश्रीने तिच्या इंस्टा अकाऊंटवरील 'Chahal' हे आडनाव काढून टाकल्याने चाहत्यांचा गोंधळ उडाला. २२ डिसेंबर २०२०मध्ये चहल व धनश्री लग्न बंधनात अडकले आणि त्यानंतर धनश्री प्रत्येक क्रिकेट सामन्यात चहलला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित दिसली. सोशल मीडियावरील या चर्चांवर भारतीय क्रिकेटपटूने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
धनश्री एक डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. धनश्री अनेक वेळा सोशल मीडियावर आपले डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कॉमेंट्स येत असतात. एवढेच नाही तर तिची स्वतःची डान्स कंपनीदेखील आहे. धनश्री वर्माचा जन्म २७ डिसेंबर १९९६ ला मुंबईत झाला. चहलने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली. त्यात असे लिहिले होते की एक नवीन जीवन सुरू होत आहे. याचा अर्थ धनश्री गरोदर आहे असाही अर्थ काढता येऊ शकतो. पण तसं असण्याची शक्यता फार कमी असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यात धनश्रीने आडनाव काढून टाकल्याने या दोघांमधील नाते तुटल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
त्यावर युजवेंद्र चहलची पहिली प्रतिक्रिया आली. त्याने लिहिले की, माझ्या आणि धनश्री यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. या सर्व चर्चा आता थांबवा. सर्वांना खूप खूप प्रेम.