Join us  

IPL 2024 Point Table : चार संघांचे प्रत्येकी ४, तर ५ संघांचे प्रत्येकी २ गुण; एक संघ ज्याची पाटी कोरी

IPL 2024 Point Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील १३ सामन्यानंतर ९ संघांनी किमान १ विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने रविवारी विशाखापट्टणम येथे चेन्नई सुपर किंग्सचा विजयरथ रोखला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 4:08 PM

Open in App

IPL 2024 Point Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील १३ सामन्यानंतर ९ संघांनी किमान १ विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने रविवारी विशाखापट्टणम येथे चेन्नई सुपर किंग्सचा विजयरथ रोखला. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स ( KKR ) गुणतालिकेत अव्वल स्थानावर सरकला आहे. KKR सह CSK, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण जमा झाले आहेत आणि ५ संघांच्या खात्यात प्रत्येकी २ गुण आहेत. म्हणजेच १० पैकी ९ संघांनी विजयाचे खाते उघडले आहे, फक्त एक संघ असा आहे की जो अजूनही विजय मिळवू शकलेला नाही. हा संघ कोणता हे जाणून घेतल्यास चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसेल, हे नक्की...

मुंबईचा राजा रोहित शर्मा! फॅन्सची जोरदार तयारी, हार्दिकला आजचा सामना जाणार भारी?

कालच्या सामन्यापूर्वी आयपीएल २०२४ मध्ये पहिल्या १२ सामन्यांत अनेक रेकॉर्ड मोडले. पहिल्या १२ सामन्यांत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघांनी ११ विजय मिळवले आहेत. या १२ सामन्यांत ९.४ च्या रन रेटने ४४६७ धावा कुटल्या गेल्या आहेत, ज्या आयपीएलच्या यापूर्वीच्या सर्व हंगामातील पहिल्या १२ सामन्यांतली सर्वाधिक धावा आहेत. पहिल्या १२ सामन्यांत सर्वाधिक २२६ षटकार लगावले गेले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी प्रत्येकी ३ सामने खेळले आहेत.

चेन्नईने RCB व GT यांच्यावर विजय मिळवला आहे, तर DC कडून त्यांना हार पत्करावी लागली आहे. KKR ने दोन्ही सामन्यांत RCB व SRH यांना, RR ने त्यांच्या दोन सामन्यांत DC व LSG ला पराभूत केले आहे. हे दोनच संघ आतापर्यंत अपराजित आहेत. सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या खात्यात प्रत्येकी २ गुण आहेत. मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे की ज्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. MI ला SRH व GT कडून पराभव पत्करावा लागला आहे आणि त्यामुळे ते तालिकेत दहाव्या क्रमांकावर आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स