India squad for ICC World Test Championship 2023 Final - बीसीसीआयने मंगळवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी ( WTC Final) टीम इंडियाची घोषणा केली. आयपीएल २०२३ गाजवत असलेल्या अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) १७ महिन्यांनंतर कसोटी संघात पुन्हा संधी दिली गेली. सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म अन् श्रेयस अय्यरची दुखापत यामुळे टीम इंडियाला मधल्या फळीत सावरण्यासाठी अजिंक्यसारखा अनुभवी खेळाडू हवाच होता. १४ जानेवारी २०२२ नंतर अजिंक्य टीम इंडियात पुनरागमन करणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर संघाबाहेर असलेल्या अजिंक्यने स्थानिक स्पर्धांमध्येही दमदार कामगिरी करून BCCIला त्याची दखल घेण्यास भाग पाडले होते. बीसीसीआयने वार्षिक करारातून हटवल्यानंतरही अजिंक्य न खचता सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिला. ७ ते ११ जून या कालावधीत लंडन येथील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही फायनल होणार आहे. इंग्लंडमध्ये अजिंक्यने १५ कसोटींत ४३.०३च्या सरासरीने ७२९ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व पाच अर्धशतकांचा समावेश आहे. ओव्हल मैदानावरील त्याची कामगिरी काही खास नाही. येथे २०१४ ते २०२१ या कालावधीत खेळलेल्या तीन कसोटींत त्याला केवळ ५५ धावा करता आलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रहाणेने १७ कसोटींत दोन शतकं व ५ अर्धशतकांसह १०९० धावा केल्या आहेत.
अजिंक्य रहाणे म्हणाला,'' जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी निवड झाल्याने मी आनंदीत आहे. मी सध्या ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, त्यावरून माझा आत्मविश्वासही वाढलेला आहे. या निवडीचे सर्वाधिक श्रेय हे चेन्नई सुपर किंग्सला जाते, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला.''
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गि, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: A lot of credit goes to CSK for Showing faith in me; Ajinkya Rahane on his inclusion in the World Test Championship Final 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.