Join us

"टीम इंडियातील विवाहित खेळाडू मला सतत मेसेज करतो, फोन नंबर मागतो’’, इन्फ्लुएंसर तरुणीचा दावा, कोण आहे तो?  

Indian Cricketer News: एका भारतीय लेगस्पिनरबातत प्रसिद्ध महिला इन्फ्लुएन्सरने सनसनाटी दावा केला आहे. हा विवाहित फिरकीपटू सातत्याने आपल्याला मेसेज करतो, तसेच फोन नंबर मागतो, असा दावा या तरुणीने केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:55 IST

Open in App

आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे भारतीय क्रिकेटपटूंचाही आता ग्लॅमरस जगातील वावर वाढला आहे. तसेच खेळाडूंच्या मैदानातील कामगिरीबरोबरच त्यांचं वैयक्तिक जीवनही चर्चेचा विषय ठरू लागलं आहे. क्रिकेटपटूंची रिलेशनशिप, अफेअर्स, घटस्फोट आदी बाबी बातम्यांचा विषय ठरू लागल्या आहेत. दरम्यान, आता एका भारतीय लेगस्पिनरबातत प्रसिद्ध महिला इन्फ्लुएन्सरने सनसनाटी दावा केला आहे. हा विवाहित फिरकीपटू सातत्याने आपल्याला मेसेज करतो, तसेच फोन नंबर मागतो, असा दावा या तरुणीने केला आहे.

सीमा कान्याल नावाच्या प्रसिद्ध महिला इन्फ्लुएन्सरने हा दावा केला आहे. तुम्हाला कुणीतरी आवडत असेल, तर ते सांगणं चुकीचं नाही. मात्र तुमची आवड कुठावर तरी लादणं चुकीचं आहे, असं सीमा कान्याल हिनं म्हटलं आहे. एका पॉडकास्टमधून सीमा हिने या भारतीय फिरकीपटूबाबत गौप्यस्फोट केला आहे. विवाहित असलेल्या या भारतीय फिरकीपटूने सोशल मीडियावरून अनेकदा मेसेज करून माझा फोन नंबर मागितला. एवढंच नाही तर त्याने मला भेटायलाही बोलावले. पाच सहा महिन्यांपासून हा क्रिकेटपटू मला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवतो. त्याखाली त्याची एक लांबलचक पोस्ट असते. दरम्यान, सीमा हिने या क्रिकेटपटूचं नाव सांगितलं नसतं तरी तो टीम इंडियाचा सदस्य होता, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे सीमा कान्याल हिला सारखे मेसेज पाठवणारा हा फिरकीपटू कोण, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आता सीमा कान्याल हिच्याबाबत बोलायचं झाल्यास ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच वेळोवेळी ट्रॅव्हल आणि वेगवेगळ्या कपड्यांमधील फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान, २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलपूर्वी सीमा कान्याल हिने केलेल्या दाव्यामुळे भारतीय क्रिकेट जगतामध्ये नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघसोशल मीडिया