IPL 2024 Updates: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. केकेआर आणि आरसीबी यांच्यात सामना होणार म्हटलं की, विराट कोहली विरूद्ध गौतम गंभीर असे वातावरण तयार केले जाते. पण, मागील हंगामात गंभीर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक होता. आता त्याची केकेआरच्या संघात घरवापसी झाली असून त्याच्यावर खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आहे. बंगळुरूतील चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि केकेआर यांच्यात लढत होत आहे. (IPL 2024 News)
आजच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला गौतम गंभीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो म्हणतो की, मला नेहमीच एका संघाला पराभूत करायला आवडेल तो संघ म्हणजे आरसीबी... माझे ते स्वप्नच आहे. कारण त्यांचा संघ एक हायप्रोफाईल आहे. ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीसारखे खेळाडू आहेत. आम्ही तीन मोठे विजय त्यांच्याविरोधातच मिळवले आहेत. आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामातील पहिला सामना, RCB ४९ वर सर्वबाद आणि ६ षटकांत १०० धावा देखील आरसीबीविरूद्ध सर्वप्रथम केकेआरच्या संघाने केल्या आहेत. आमचा संघ नेहमीच त्यांच्यापेक्षा मजबूत राहिला आहे.
सामन्याआधी 'विराट' चर्चा
दरम्यान, केकेआर आज आपला दुसरा तर आरसीबी तिसरा सामना खेळत आहे. आरसीबीला आपल्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव केला. केकेआरने आपल्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादला नमवून विजयी सलामी दिली.
RCB चा संभाव्य संघ -
फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, दिनेश कार्तिक, आकाश दीप, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, स्वप्निल सिंह, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, विल जॅक्स, कॅमरून ग्रीन.
KKR चा संभाव्य संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल साल्ट, व्यंकटेश अय्यर, रममनदीप सिंग, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, आरोन वरूण, हर्षित राणा, नितीश राणा, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल.
Web Title: A photo of Virat Kohli and Gautam Gambhir before the ipl 2024 RCB vs KKR match is going viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.