virat kohli । मुंबई : भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हा केवळ एक खेळाडूच नाही तर देशातील तरुणांसाठी एक आदर्श बनला आहे. 2019-22 या वर्षात खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या कोहलीने मागील वर्षी आशिया चषक स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन केले आणि शानदार शतक ठोकले. कोहलीचे हे उदाहरण अनेक ठिकाणी केस स्टडी म्हणून देखील वापरले गेले आहे. अशातच आता इयत्ता 9वीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोहलीच्या पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे.
दरम्यान, 9वीच्या प्रश्नपत्रिकेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली 71 व्या आंतरराष्ट्रीय शतकाचा आनंद साजरा करताना दिसत आहे, जे त्याने आशिया चषक 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध केले होते. या फोटोचे विद्यार्थ्यांना अंदाजे 100-120 शब्दांत वर्णन करण्यास सांगितले आहे. हा फोटो व्हायरल होताच विराटचे चाहते ट्विटरवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, "मला इयत्ता 9वीमध्ये असे प्रश्न का विचारण्यात आले नाहीत." त्याचवेळी दुसर्या युजरने लिहिले की, "जर हा प्रश्न माझ्या परीक्षेत आला असता तर मी सहज 10 पाने लिहिली असती."
खरं तर विराट कोहली ट्वेंटी-20 विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. यापूर्वी त्याने बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध दोन वन डे शतके झळकावली होती. अलीकडेच पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात किंग कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावून दीर्घकाळ चाललेला कसोटी शतकाचा दुष्काळ संपवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: A question related to Virat Kohli was asked in the question paper of 9th and the fans have some reactions
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.