इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५व्या पर्वाला सुरुवात होण्याआधी महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. आयपीएल २०२२ला २६ मार्चपासून सुरुवात होणार असल्याचे बीसीसीआयने शुक्रवारी जाहीर केले आणि त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनीचा नवा लूक साऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये धोनी आघाडीवर आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली CSKने १२ हंगामांपैकी ११ वेळा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने चार जेतेपदं जिंकली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली CSK पुन्हा एकदा दबदबा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
आयपीएलचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या Star Sports वाहिनीने IPL 2022च्या प्रोमोचा टीझर शनिवारी लाँच केला. यात मिशीसह दिसणाऱ्या धोनीनं साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी), केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).