Join us  

२६२.९५ कोटी, १,१६६ खेळाडूंची नोंदणी; IPL 2024 Auction मध्ये वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू

IPL 2024 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२४साठी होणाऱ्या लिलावासाठी स्टार खेळाडूंसह एकूण ११६६ जणांनी नावे नोंदवली आहेत,

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 8:01 PM

Open in App

IPL 2024 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२४साठी होणाऱ्या लिलावासाठी स्टार खेळाडूंसह एकूण ११६६ जणांनी नावे नोंदवली आहेत, परंतु मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलेल्या जोफ्रा आर्चरचे ( Jofra Archer) नाव या यादीतून गायब आहे. १ हजार १६६ खेळाडूंच्या नावाची यादी आयपीएल आयोजकांकडे सोपवण्यात आली आहे आणि १९ डिसेंबरला दुबईत हा लिलाव पार पडणार आहे.

मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, डॅरिल मिशेल आणि रचीन रवींद्र यांसारखे वर्ल्ड कप गाजवणाऱ्या खेळाडूंसाठी १० फ्रँचायझींमध्ये चढाओढ पाहायला मिळेल. लीगमध्ये फ्रँचायझी शोधू पाहणाऱ्या जागतिक नावांपैकी आहेत. जोश हेझलवूड आयपीएलच्या काही सामन्यांना मुकणार असला, तरी त्यानेही नाव नोंदवले आहे. ११६६ खेळाडूंमध्ये ८३० भारतीय आणि ३३६ परदेशी खेळाडू आहेत. यापैकी २१२ खेळआडू कॅप्ड आहेत, तर ९०९ अनकॅप्ड आणि ४५ संलग्न देशांतील आहेत.  

८३० भारतीय खेळाडूंपैकी १८ कॅप्ड खेळाडूंमध्ये वरुण आरोन, केएस भरत, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, मनीष पांडे, हर्षल पटेल, चेतन सकारीया, मनदीप सिंग, बरिंदर सरन, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, हनुमा विहारी, संदीप वॉ़रियर्स व उमेश यादव हे आहेत.  कॅप्ड भारतीयांपैकी फक्त चार  हर्षल पटेल, केदार जाधव, शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव  यांची मूळ किंत २ कोटी ठेवली आहे. 

वर्ल्ड कपमधील आदिल रशीद, हॅरी ब्रूक आणि डेविड मलान यांच्यासह अनेक इंग्लिश खेळाडू आहेत. रेहान अहमद ( ५० लाख), गुस ऍटकिन्सन (१ कोटी), टॉम बॅंटन (२ कोटी), सॅम बिलिंग्स (१ कोटी), हॅरी ब्रूक (२ कोटी), ब्रायडन कार्स (५० लाख रुपये), टॉम कुरन ( १.५ कोटी), बेन डकेट ( २ कोटी), जॉर्ज गार्टन (५० लाख), रिचर्ड ग्लीसन (५० लाख), सॅम्युअल हेन (५० लाख), ख्रिस जॉर्डन ( १.५ कोटी), डेविड मालन ( १.५ कोटी), टायमल मिल्स ( १.५ कोटी), जेमी ओव्हरटन ( २ कोटी), ऑली पोप (५० लाख), आदिल रशीद (२ कोटी), फिलिप सॉल्ट (१.५ कोटी रु. ), जॉर्ज स्क्रिमशॉ ( ५० लाख), ऑली स्टोन ( ७५ लाख), डेव्हिड विली ( २ कोटी), ख्रिस वोक्स ( २ कोटी), ल्यूक वुड (५० लाख) आणि मार्क एडेयर (५० लाख)  यांचा या यादीत  समावेश आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने फ्रँचायझींना लिलाव नोंदणीमध्ये सूचीबद्ध नसलेल्या अतिरिक्त खेळाडूंमध्ये नाव नसलेल्या, परंतु त्यांना हव्या असलेल्या खेळाडूंची नावं सुचवण्यास सांगितले आहे. विनंती केलेले खेळाडू  लिलावात समाविष्ट केले जातील. फ्रँचायझींना नोंदणीकृत खेळाडूंच्या यादीसह प्रतिसाद देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. फक्त ७७ स्लॉट भरायचे आहेत, त्यापैकी जास्तीत जास्त ३० परदेशी खेळाडू असू शकतात.

 

टॅग्स :आयपीएल २०२३आयपीएल लिलाव