Steffan Nero finishes 309* (140) - ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टेफान नेरो ( Steffan Nero) याने वन डे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याने १४० चेंडूंत नाबाद ३०९ धावा चोपून नव्या विक्रमाला गवसणी घातली. वन डेक्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा स्टेफान हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अंध क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध ही विक्रमी कामगिरी केली. यासह त्याने पाकिस्तानच्या मसून जानने १९९८साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोंदवलेला २६२ धावांचा विक्रम मोडला.
स्टेफानने १४० चेंडूंत ४९ चौकार व १ षटकार खेचून ही विक्रमी खेळी केली. ४० षटकांच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५४१ धावांचा डोंगर उभा केला. वन डे क्रिकेटमधील कोणत्याही संघाकडून झालेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. स्टेफानशिवा य मायकल जॅनिसने ५८ व ब्रियूर माईगाने ५० धावा केल्या. ५४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला २७२ धावा करता आल्या आणि ऑस्ट्रेलिायने २६९ धावांनी सामना जिंकला.
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात ८ सामन्यांच्या या मालिकेत ऑसींनी आतापर्यंत झालेल्या ६ लढती जिंकल्या आहेत. स्टेफानने या मालिकेत खेळलेल्या तीनही सामन्यांत शतकी खेळी केली आहे. त्याने पहिल्या सामन्यात १४६ चेंडूंत ११२ धावा आणि दुसऱ्या सामन्यात ४७ चेंडूंत १०१ धावा केल्या आहेत.
अंध क्रिकेट मध्ये ११-११ खेळाडू खेळतात, परंतु त्यांची विभागणी तीन गटांत केलेली असते. ४ खेळाडू पूर्णपणे अंध असतात, ३ खेळाडू आंशिक दृष्टीहीन असतात, तर ४ खेळाडूंना आंशिक दिसते.
Web Title: A TRIPLE century! Steffan Nero finishes 309* (140) in the Australian Blind Cricket Team's first ODI against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.