Join us  

Virat Kohli: आरारा खतरनाक! किंग कोहलीच्या 'प्रेमात' तिने विराटच्या पुतळ्यालाच केला किस, Video Viral

virat kohli statue: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 2:10 PM

Open in App

virat kohli statue viral video । नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. किंग कोहलीची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर असतात. क्रिकेटच्या मैदानात सुरक्षेच्या कारणास्तव चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटू शकत नाहीत. मात्र, जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व गाजवणाऱ्या किंग कोहलीच्या एका लेडी फॅनचा भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. खरं तर ही फॅन किंग कोहलीच्या पुतळ्याला किस करताना दिसत आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला फॅन विराटच्या पुतळ्याचे चुंबन घेत आहे. या व्हिडीओवर चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका महिला युजरने कमेंटच्या माध्यमातून मजेशीरपणे म्हटले की, "हे पाहण्याआधी माझा मृत्यू का झाला नाही." तर एका युजरने लिहले की, यांपासून आता पुतळे देखील सुरक्षित नाहीत. 

BGT मालिकेत भारताचे वर्चस्व भारतीय संघ सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून रोहित सेनेने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या दोन सामन्यात कोहलीने काही खास कामगिरी केली नाही, तरीदेखील त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा आकडा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात 44 धावा केल्या. इथे वादग्रस्त निर्णयामुळे विराट कोहलीला एलबीडब्ल्यू बाद घोषित केले. 

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ -  रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :विराट कोहलीसोशल व्हायरलभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App