Join us  

VIDEO: पाकिस्तान- न्यूझीलंड Live Match मध्ये मैदानात शिरला Nude फॅन

सध्या पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये ट्राय सीरिजचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 1:38 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये ट्राय सीरिजचा थरार रंगला आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पार पडला. या दुसऱ्या सामन्यात एक फॅन चक्क नग्न अवस्थेत मैदानात उतरला. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या ट्राय सीरिजच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान ही अनोखी घटना पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

दरम्यान, पाकिस्तानी संघाची फलंदाजी सुरू असताना हा सर्व थरार पाहायला मिळाला. व्हायरल व्हिडीओमध्ये एक जबरा फॅन दिसत आहे जो नग्न अवस्थेत मैदानात शिरला आहे. एवढेच नाही तर तो खेळाडूंच्या अगदी जवळ देखील पोहोचतो. यानंतर मैदानात उपस्थित सुरक्षारक्षकांनी मैदानात घुसलेल्या या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याला मैदानाबाहेर काढले.

आता या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणार्‍या सामन्यांदरम्यान एखाद्या व्यक्तीने ग्राउंड सुरक्षेला आरसा दाखवल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी देखील लाईव्ह सामन्यादरम्यान सुरक्षारक्षकांना चकमा देत अनेक चाहते खेळाडूंना भेटण्याच्या प्रयत्नात मैदानात घुसले आहेत. 

पाकिस्तानचा मोठा विजय ट्राय सीरिजच्या या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने शानदार विजय मिळवला, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी साजेशी खेळी करून 20 षटकांत 147 धावा उभारल्या. पाकिस्तानला विजयासाठी 148 धावा करायच्या होत्या, ज्या कर्णधार बाबर आझमच्या 79 धावांच्या खेळीच्या जोरावर त्यांनी सहज गाठल्या. ट्राय सीरिजमधील आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी दोन पाकिस्तानने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने एक सामना जिंकला आहे. बांगलादेशच्या संघाला अद्याप विजयाचे खातेही उघडता आले नाही.

सर्व महत्त्वाच्या घडामोडींसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडबांगलादेशतिरंगी मालिकाआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App