asia cup 2023 | नवी दिल्ली : ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी २ सप्टेंबर रोजी आमनेसामने असणार आहेत. आगामी मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्वच संघ कामाला लागले आहेत. काही संघांचे संघ देखील जाहीर झाले आहेत. अशातच एका बांगलादेशी खेळाडूचा अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बांगलादेशी खेळाडू आशिया चषकाचा सराव करताना निखाऱ्यावरून चालताना दिसत आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी आशिया चषकासाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात २३ वर्षीय मोहम्मद नईमला देखील स्थान मिळाले आहे. नईमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो धाडसी सराव करताना चक्क निखाऱ्यावरून चालत आहेत.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, नईम ट्रेनरच्या मदतीने गरम निखाऱ्यांवर चालत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशमध्ये हे प्रशिक्षण सामान्य आहे, ज्यामुळे खेळाडूला शांत आणि आरामशीर राहण्यास मदत होते.
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल