नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज महेंद्रसिंग धोनीसाठी आगामी आयपीएल हंगाम शेवटचा असू शकतो. धोनी 2023च्या हंगामानंतर निवृत्ती घेणार असल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. अशातच धोनी आगामी आयपीएलसाठी फलंदाजीचा सराव करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
खरं तर धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तेव्हापासून तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसला आहे. अशातच 41 वर्षीय धोनी पुन्हा एकदा सराव करण्यासाठी खेळपट्टीवर उतरला आहे. 4 वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकणाऱ्या धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो नेट्सवर सराव करताना पाहायला मिळत आहे.
धोनीने फुंकले रणशिंग
दरम्यान, आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यासाठी 3 महिन्यांहून कमी कालावधी राहिला आहे. या मेगा इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर धोनीने तयारीला सुरूवात केली आहे. आयपीएलचा पुढील हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. 13 हंगामात सीएसकेचे प्रतिनिधित्व करणारा धोनी पुन्हा एकदा चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.
2023च्या हंगामासाठी CSKचा संघ -
महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, थिक्साना महिषा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन प्रेटोरियस, मुकेश चौधरी, समिरजीत सिंग, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी, सुभ्रांषू सेनापती, शैक राशीद, निशांत सिंधू, कायले जेमिन्सन, अजय मंडल, भगत वर्मा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: A video of Chennai Super Kings player Mahendra Singh Dhoni starting practice for IPL 2023 is going viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.