Join us  

Shoaib Malik: "...ते मी कधीच विसरू शकत नाही", लाईव्ह शोमध्ये शोएब मलिकला अश्रू अनावर!

पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक सध्या खूप चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 2:15 PM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज शोएब मलिक सध्या सानिया मिर्झासोबतच्या त्याच्या नात्यामुळे चर्चेत आहे. तो आणि सानिया वेगळे होणार असल्याचे बोलले जात आहे. शोएब मलिकच्या वैवाहिक जीवनाची चर्चा रंगली असताना त्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शोएब लाईव्ह शोमध्ये रडताना पाहायला मिळत आहे. 

हा व्हिडीओ पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२२च्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधीचा आहे. अर्थात हा व्हिडीओ कालचा आहे, ज्यामध्ये वकार युनूस, वसीम अक्रम, मिसबाह-उल-हक आणि शोएब मलिक एका पाकिस्तानी चॅनलवर फायनलच्या सामन्यासंबंधी चर्चा करत होते. यादरम्यान अँकरने शोएब मलिकला २००७च्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलमधील पराभव आणि २००९ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकण्याबाबत प्रश्न विचारला होता. मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना शोएब भावुक झाला आणि लाईव्ह शोमध्येच त्याला रडू कोसळले. लक्षणीय बाब म्हणजे २००९ मध्ये मिस्बाह उल हकने विजयाची ट्रॉफी माझ्याकडे दिल्यामुळे मी भावुक झालो असल्याचे शोएबने यावेळी स्पष्ट केले. कारण ती फिलिंग मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही असेही मलिकने म्हटले. 

सानिया-शोएब यांचा घटस्फोट होणार? ंकरने प्रश्न विचारताच शोएब मलिकला अश्रू अनावर झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहते हा व्हिडीओ खूप शेअर करत आहेत. खरं तर शोएब मलिक सध्या त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे खूप चर्चेत आहे. मात्र अद्यापही त्याने याबाबत काहीही उघडपणे जाहीर केले नाही. सानिया मिर्झासह त्याच्या घटस्फोटाच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे, परंतु अद्याप या प्रकरणावर दोघांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात फायनलचा रनसंग्रामआज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात फायनलचा सामना खेळवला जात आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील विजेता संघ विश्वचषकाच्या किताबावर आपले नाव कोरेल. खरं तर आयसीसीला आज आणखी एक असा चॅम्पियन संघ मिळेल, ज्याने या स्पर्धेत दोनवेळा विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी केवळ वेस्ट इंडिजच्या संघाने दोनवेळा हा किताब पटकावला आहे. आजच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानइंग्लंडशोएब मलिक
Open in App