नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून विजयी सलामी दिली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यातील अखेरच्या षटकात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्यांच्या आठवणी अद्यापही ताज्या आहेत. अशातच या सामन्याच्या शेवटच्या षटकातील एक कॉमेंट्री खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत आकाश चोप्रा, संजय बांगर आणि गौतम गंभीर दिसत आहेत.
याआधी आयसीसीने या सामन्याच्या एका दिवसानंतर शेवटच्या दोन षटकांचा व्हिडीओ जारी केला होता, ज्यामध्ये हर्षा भोगले त्याच्या आवाजात चाहत्यांचे मनोरंजन करत होता. अशीच एक व्हिडीओ स्टार स्पोर्ट्सनेही एक व्हिडीओ शेअर केला. परंतु या व्हायरल क्लिपमधील गौतम गंभीरचे हावभाव पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गौतम गंभीरचा व्हिडीओ व्हायरल
शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावांची गरज होती आणि पाकिस्तानकडून मोहम्मद नवाज शेवटचे षटक टाकत होता. हारिस रौफला सलग दोन षटकार ठोकून किंग कोहलीने भारताला विजयाकडे नेले. पण पाकिस्तानच्या फिरकीपटूने अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याला बाद केले आणि नंतरच्या दोन चेंडूंवर तीन धावा दिल्या. शेवटच्या तीन चेंडूमधील घडामोडी पाहण्याजोग्या होत्या. यानंतर अखेरच्या षटकांतील तिसऱ्या चेंडूवर कोहलीने षटकार ठोकला तो चेंडू नो बॉल घोषित करण्यात आला. पुढचा चेंडू दबावात असलेल्या नवाजने वाईट फेकला. म्हणून पुढच्या चेंडूवर देखील कोहलीला फ्री हिट मिळाली आणि त्याचा त्रिफळा उडला असताना देखील कोहली-कार्तिकच्या जोडीने ३ धावा काढल्या. अखेरच्या चेंडूत १ धाव पाहिजे असताना आर अश्विनने चौकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
गौतम गंभीरचे हावभाव पाहून चाहते नाराज स्टार स्पोर्ट्सने या शेवटच्या षटकाची समालोचन क्लिप शेअर केली ज्यामध्ये आकाश चोप्रा त्या अंतिम षटकावर मजेशीर कॉमेंट्री करत आहे. तर संजय बांगर देखील त्याची साथ देत होते. मात्र गौतम गंभीरच्या कृतीने चाहते थक्क झाले. या संपूर्ण क्लिपमध्ये गंभीर काहीही बोलला नाही आणि सुरुवातीला तो त्याच्या डोळ्यांना स्पर्श करत होता, जे पाहून चाहत्यांना वाटले की त्याला या सामन्यात रस नाही आणि तो फक्त झोपत आहे.
किंग कोहलीची शानदार नाबाद खेळीपाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाच्या अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १८ चेंडूत विजयासाठी ४८ धावांची गरज असताना विराटने शानदार खेळी केली. अखेर हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"