राशिद खानला गल्ली क्रिकेटची 'भुरळ', अफगाणी खेळाडूवर चाहत्यांनी केला 'प्रेमाचा वर्षाव'

rashid khan ipl 2023 : आयपीएल २०२३ मध्ये देखील गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ अप्रतिम कामगिरी करत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 05:24 PM2023-05-05T17:24:28+5:302023-05-05T17:25:31+5:30

whatsapp join usJoin us
 A video of Gujarat Titans player Rashid Khan playing street cricket in IPL 2023 is going viral on social media  | राशिद खानला गल्ली क्रिकेटची 'भुरळ', अफगाणी खेळाडूवर चाहत्यांनी केला 'प्रेमाचा वर्षाव'

राशिद खानला गल्ली क्रिकेटची 'भुरळ', अफगाणी खेळाडूवर चाहत्यांनी केला 'प्रेमाचा वर्षाव'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मध्ये देखील गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ अप्रतिम कामगिरी करत आहे. गुजरातच्या संघाचा अष्टपैलू खेळाडू राशिद खानने आपल्या फिरकीच्या तालावर अनेकांना नाचवले. यंदाच्या हंगामात हॅटट्रिक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. त्याने ९ सामन्यांमध्ये १५ बळी घेऊन संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. खरं तर राशिदला यंदाच्या पर्वात फलंदाजी करण्याची फारशी संधी मिळाली नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राशिद गल्ली क्रिकेटमध्ये फलंदाजीचा आनंद घेताना दिसत आहे.

राशिदने गुजरातमध्ये लहानग्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यामध्ये राशिद खान फलंदाजी करताना दिसत असून मोठे फटके मारत आहे. हा व्हिडीओ गुजरातमधील गांधीनगर येथील असल्याचा नेटकरी म्हणत आहेत. 

चाहत्यांकडून राशिदवर प्रेमाचा वर्षाव

गुजरात टॉपवर
आयपीएल २०२३ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. आतापर्यंत सर्वच संघांनी नऊ ते दहा सामने खेळले असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. लक्षणीय बाब म्हणजे आताच्या घडीला सर्व दहा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. १२ गुणांसह गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबीचा संघ दहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 


 

Web Title:  A video of Gujarat Titans player Rashid Khan playing street cricket in IPL 2023 is going viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.