Join us  

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकिटांवरून मोठा गोंधळ, पोलिसांनी केला लाठीचार्ज 

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 2:13 PM

Open in App

हैदराबाद : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील तिसरा म्हणजेच अखेरचा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता असून तिकीट काढण्यासाठी प्रचंड गर्दी जमल्याने हैदराबादमध्ये एकच गोंधळ उडाला होता. गर्दीमुळे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांना तिकीट काढण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर लाठीमार करावा लागला. तिकिटांसाठी जमलेल्या गर्दीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस चाहत्यांवर सौम्य लाठीचार्ज करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना पाहण्यासाठी चाहते पहाटेपासूनच तिकीट काउंटरवर पोहोचू लागले होते. काउंटर उघडेपर्यंत गर्दी खूप वाढली होती, त्यानंतर बेकायदा झालेल्या लोकांवर पोलिसांना प्रसंगी लाठीमार करावा लागला. मालिकेतील अखेरचा सामना 25 सप्टेंबर रोजी होणार आहे.

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामीतीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवून ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयी सलामी दिली आहे. 20 सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 208 धावांचा बचाव करता आला नव्हता. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने 4 बळी राखून मोठा विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांनी शानदार खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 71 धावांची ताबडतोब खेळी करून धावसंख्या 200 पार नेली. मात्र कागांरूच्या फलंदाजांनी घातक फलंदाजी करून निसटता विजय मिळवला. 

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक  २० सप्टेंबर मोहाली २३ सप्टेंबर - नागपूर २५ सप्टेंबर- हैदराबाद 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाहैदराबादतिकिटपोलिसबीसीसीआय
Open in App