"तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही", MI च्या खेळाडूंनी गायलं गाणं अन् रोहितनं घेतली फिरकी

 rohit sharma ipl mi : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी गाणं गायल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 01:26 PM2023-05-23T13:26:40+5:302023-05-23T13:27:09+5:30

whatsapp join usJoin us
A video of Mumbai Indians players singing a song is going viral, in which Rohit Sharma, Suryakumar Yadav and Nehal Vadra are seen  | "तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही", MI च्या खेळाडूंनी गायलं गाणं अन् रोहितनं घेतली फिरकी

"तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही", MI च्या खेळाडूंनी गायलं गाणं अन् रोहितनं घेतली फिरकी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

rohit sharma ipl । मुंबई : आयपीएल २०२३ च्या साखळी फेरीतील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला अन् मुंबईला खुशखबर मिळाली. आरसीबीचा संघ आयपीएलमधून बाहेर झाला तर मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली. १६ गुणांसह रोहितसेनेने प्लेऑफमध्ये जागा मिळवली असून मुंबईचा आगामी सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत होणार आहे. या सामन्याच्या आधी मुंबईच्या खेळाडूंची एक व्हिडीओ समोर आली आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवसह काही शिलेदार एक गाणे गात आहेत.

हा व्हिडीओ कर्णधार रोहित शर्माने शेअर केला आहे. व्हिडीओची सुरुवात मुंबईचा युवा खेळाडू नेहल वढेरा 'सैय्या...' या गाण्याने करतो. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा देखील हे गाणं गाण्याचा प्रयत्न करतात. गाण्याची चुकलेली स्टेप अन् स्वर पाहून खेळाडूंनाही हसू आवरत नाही. व्हिडीओ शेअर करताना रोहितने कॅप्शनच्या माध्यमातून सहकाऱ्यांची फिरकी घेतली. "तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही", असे रोहितने मजेशीरपणे लिहले. याशिवाय हिटमॅनने एक फनी इमोजी शेअर केली आहे. 

"आता आमचे पुढचे लक्ष्य एकच...", विराट कोहली भावुक; निष्ठावंत चाहत्यांचे मानले आभार

मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये धडक 
रविवारी झालेला गुजरातविरूद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 'करा किंवा मरा' असा होता. गतविजेत्यांना पराभूत करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचे आव्हान विराट आर्मीसमोर होते. पण गुजरातने आपला विजयरथ कायम ठेवून आरसीबीला बाहेरचा रस्ता दाखवला अन् मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. आरसीबीने दिलेल्या १९९ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने १०४ धावांची नाबाद शतकी खेळी करून गुजरातला विजय मिळवून दिला. एकूणच विराटच्या शतकावर गिलचे शतक 'भारी' पडल्याचे दिसले. बुधवारी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. यातील विजयी संघ चेन्नई आणि गुजरात यांच्यातील पराभूत संघासोबत खेळेल, तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर होईल. 

 

Web Title: A video of Mumbai Indians players singing a song is going viral, in which Rohit Sharma, Suryakumar Yadav and Nehal Vadra are seen 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.