नवी दिल्ली : भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहली 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये आहे. कोहलीने या स्पर्धेत आतापर्यंत 2 अर्धशतके झळकावली आहेत. किंग कोहली अनेकदा आपल्या सहकारी खेळाडूंना मदत करताना दिसतो आणि पुन्हा एकदा याचाच प्रत्यय पाहायला मिळाला आहे. खरं तर भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. भारताचा आगामी सामना उद्या बांगलादेशविरूद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी विराट खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या लोकेश राहुलला मदत करताना दिसला आहे. ॲडलेडमधील सराव सत्रादरम्यान विराटने राहुलला फलंदाजीच्या काही टिप्स दिल्या.
सोशल मीडियावर विराट कोहली आणि लोकेश राहुल यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विराट कोहली लोकेश राहुलशी संवाद साधताना दिसत आहे. यासोबतच किंग कोहली राहुलला फलंदाजीच्या काही टिप्स देखील देत आहे. दुसर्या व्हिडीओमध्ये लोकेश राहुलला फलंदाजी करताना पाहिल्यानंतर विराट त्याला प्रशिक्षण देत आहे.
किंग कोहलीचा शानदार फॉर्मभारतीय संघाचा आघाडीचा फलंदाजी विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये आहे. मागील सामन्यात विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जास्त धावा करता आल्या नाहीत. या सामन्यात तो केवळ 12 धावा करून बाद झाला. परंतु असे असूनही विराट अजूनही ब्ल्यू आर्मीसाठी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तीन सामन्यांमध्ये विराटने 144.44 च्या स्ट्राईक रेटने 156 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोनदा नाबाद अर्धशतके झळकावली आहेत.
लोकेश राहुलचा खराब फॉर्मखरं तर चालू विश्वचषकात भारतीय संघाचे सर्व खेळाडू शानदार फॉर्ममध्ये आहेत. मात्र सलामीवीर लोकेश राहुल याला अपवाद आहे. राहुलने आतापर्यंत तीन सामन्यांत 7.33 च्या खराब सरासरीने 22 धावा केल्या आहेत. भारतीय संघाच्या सलामीवीराचा स्ट्राईक रेट 64.70 आहे. यावरून स्पष्टपणे दिसून येते की लोकेश राहुल त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममधून जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"