नवी दिल्ली : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय संघ आगामी टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियाला गेला आहे. तिथे रोहित सेना विश्वचषकाच्या तयारीला लागली आहे. रोहित शर्माचा संघ आपला पहिला सराव सामना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. खरं तर कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत पुन्हा एकदा ओपनिंगमध्ये फ्लॉप ठरले आहेत. मात्र या सामन्यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) चाहत्यांची मने जिंकताना दिसला. त्याने ऑस्ट्रेलियातील आपल्या चाहत्यांना मोठ्या उत्साहाने ऑटोग्राफ देऊन त्यांची मने जिंकली आहेत.
किंग कोहलीने जिंकली चाहत्यांची मने दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये किंग कोहली वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी चाहत्यांना ऑटोग्राफ देताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नावाचे नारे देखील दिले जात आहेत. या व्हिडीओला सोशल मीडियावरही खूप पसंती मिळत आहे. लक्षणीय बाब म्हणजे विराट कोहली सध्या सुरू असलेला सराव सामना खेळत नसून त्याच्या जागी दीपक हुडाला संधी देण्यात आली आहे. मात्र हु़डाला साजेशी खेळी करण्यात अपयश आले आणि तोही लवकर बाद झाला.
विराट कोहलीने आशिया चषकाच्या स्पर्धेतून आपली जुनी लय पकडली आहे. त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकात त्याची विराट झलक पाहायला मिळणार का हे पाहण्याजोगे असेल. विराटने आशिया चषकात अफगाणिस्तानविरूद्ध शतक झळकावले होते. किंग कोहलीने जवळपास 3 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले होते. विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध 3 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. अशा स्थितीत मागील विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न13 नोव्हेंबरला अंतिम सामना