वीरूचं भन्नाट ट्विट: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो पोस्ट करून रिषभ पंतचं कौतुक

अॅडलेड कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियानं जबरदस्त कमबॅक करून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे कायम राखली.

By स्वदेश घाणेकर | Published: January 20, 2021 10:23 AM2021-01-20T10:23:23+5:302021-01-20T10:24:32+5:30

whatsapp join usJoin us
‘Aaj se Brisbane Ka Naam Pant Nagar’; Virender Sehwag’s hilarious tweet for Rishabh Pant   | वीरूचं भन्नाट ट्विट: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो पोस्ट करून रिषभ पंतचं कौतुक

वीरूचं भन्नाट ट्विट: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो पोस्ट करून रिषभ पंतचं कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पोटाचा घेर वाढलेल्या रिषभ पंतवर ( Rishabh Pant) जोरदार टीका झाली होती. त्याच्या तंदुरुस्तीच्या स्थरावरूनही चर्चा झाली. पण, या सर्व टीकाकारांना रिषभनं सडेतोड उत्तर दिले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी विजयात रिषभचा सिंहाचा वाटा आहे. या मालिकेत भारताकडून ६८.५०च्या सरासरीनं सर्वाधिक २७४ धावा त्यानं केल्या आहेत. सिडनी कसोटीत अवघ्या तीन धावांनी त्याला शतकाने हुलकावणी दिली. गॅबा कसोटीत त्याच्या नाबाद ८९ धावांच्या जोरावर टीम इंडियानं ३ विकेट्स राखून सामना जिंकला आणि मालिका २-१ने खिशात घातली. 

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं मजेशीर ट्विट करून टीम इंडियाचे कौतुक केलेच शिवाय त्यानं रिषभच्या पाठीवरही कौतुकाची थाप मारली. वीरूनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यराज यांचा फोटो पोस्ट करून रिषभचे कौतुक केलं.  

त्यानं लिहिले की,''क्यू नही, रिषभ पंत. हा विजय पिढ्यानपिढ्या कुणी पाहिला नसेल असा आहे. या विजयाचा आनंद वर्षानुवर्षे साजरा केला पाहीजे. १९ जानेवारी फतेह. जय भारत.'' वीरूनं पोस्ट केलेल्या फोटोवर ब्रिस्बनचे नाव आजपासून पंतनगर असे लिहिले आहे.  


सामन्यानंतर पंत म्हणाला,''हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. मी चांगली कामगिरी करत नसतानाही संघ माझ्या पाठीशी मजबूतीनं उभा राहिला. हा विजय म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखा आहे. पहिल्या कसोटीनंतर आम्ही आणखी जोमाने सराव केला. संघ व्यवस्थापनानं मला नेहमी पाठींबा दिला. तू मॅच विनर आहे, असे ते मला सतत सांगायचे. त्यांच्या विश्वासावर खरा उतरलो याचा आनंद आहे.''

Web Title: ‘Aaj se Brisbane Ka Naam Pant Nagar’; Virender Sehwag’s hilarious tweet for Rishabh Pant  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.