इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पोटाचा घेर वाढलेल्या रिषभ पंतवर ( Rishabh Pant) जोरदार टीका झाली होती. त्याच्या तंदुरुस्तीच्या स्थरावरूनही चर्चा झाली. पण, या सर्व टीकाकारांना रिषभनं सडेतोड उत्तर दिले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी विजयात रिषभचा सिंहाचा वाटा आहे. या मालिकेत भारताकडून ६८.५०च्या सरासरीनं सर्वाधिक २७४ धावा त्यानं केल्या आहेत. सिडनी कसोटीत अवघ्या तीन धावांनी त्याला शतकाने हुलकावणी दिली. गॅबा कसोटीत त्याच्या नाबाद ८९ धावांच्या जोरावर टीम इंडियानं ३ विकेट्स राखून सामना जिंकला आणि मालिका २-१ने खिशात घातली.
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं मजेशीर ट्विट करून टीम इंडियाचे कौतुक केलेच शिवाय त्यानं रिषभच्या पाठीवरही कौतुकाची थाप मारली. वीरूनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यराज यांचा फोटो पोस्ट करून रिषभचे कौतुक केलं.
त्यानं लिहिले की,''क्यू नही, रिषभ पंत. हा विजय पिढ्यानपिढ्या कुणी पाहिला नसेल असा आहे. या विजयाचा आनंद वर्षानुवर्षे साजरा केला पाहीजे. १९ जानेवारी फतेह. जय भारत.'' वीरूनं पोस्ट केलेल्या फोटोवर ब्रिस्बनचे नाव आजपासून पंतनगर असे लिहिले आहे.