Join us

Champions Trophy 2025 : या दोन संघांपासून जरा जपून! टीम इंडियासाठी आकाश'वाणी'

भारतीय संघ 'अ' गटात यजमान पाकिस्तानसह न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघांविरुद्ध खेळताना दिसेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 19:11 IST

Open in App

Aakash Chopra on Team India's Group In Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक निश्चित झालं आहे. मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत ८ संघ सहभागी असून भारतीय संघ या स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.  भारतीय संघ 'अ' गटातून खेळताना दिसणार असून माजी क्रिकेटर, क्रिकेट समीक्षक आणि समालोच आकाश चोप्रा यांनी या गटातून खेळताना भारतीय संघाला दोन संघांचे तगडे आव्हान असेल असे म्हटले आहे. एवढेच नाही तर या दोन संघापासून टीम इंडियाने सावध राहायला हवे, असे मतही आकाश चोप्रानं मांडले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील दोन संघांपासून सावध राहा

भारतीय संघासह 'अ' गटात यजमान पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघांचा समावेश असून 'ब' गटात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. भारतीय संघ २० फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या स्पर्धेत भारतीय संघाने साखळी फेरीत पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांपासून सावध राहायला हवे, असे आकाश चोप्रांनी म्हटले आहे. कारण याआधी आयसीसीच्या स्पर्धेत या दोन्ही  संघांनी भारतीय संघाला धक्का दिला आहे.

२०१७ मध्ये पाकसंघानं मारली होती बाजी

याआधीची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही २०१७ मध्ये झाली होती. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात फायनल लढत रंगल्याचे पाहायला मिळाले होते. आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानवर भारी ठरलेल्या टीम इंडियाला त्यावेळी पाकिस्तानच्या संघाने दणका दिला होता. याच गोष्टीमुळे यंदाच्या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे गेले आहे. भारतीय संघ गत स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढून यंदा पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी प्रयत्नशील असेल.

वनडेत टीम इंडियाला तोड नाही, कारण...

भारतीय संघासाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघ तगडी फाइट देण्याची क्षमता असली तरी वनडेत भारतीय संघ भारी ठरेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह जसप्रीत बुमराहची जादू यावेळी पाहायला मिळेल, असा विश्वासही आकाश चोप्रा याने व्यक्त केलाय. वनडेमध्ये टीम इंडियाला तोड नाही, असे सांगत 'अ' गटातून भारतीय संघ सेमीचं तिकीट सहज मिळवेल, असेही आकाश चोप्रानं म्हटलं आहे. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघपाकिस्तानन्यूझीलंडबांगलादेशदुबई