ICC Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियन महिला संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाचव्यांदा बाजी मारली. ऑस्ट्रेलियानं अंतिम लढतीत भारतीय महिला संघावर ८५ धावांनी विजय मिळवला. भारतीय महिलांना वर्ल्ड कप विजेतेपद पटकावण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाच्या १८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला ९९ धावाच करता आल्या. या पराभवानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावण्यासाठी अनेकांनी सांत्वनपर ट्विट केले. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राचाही त्यात समावेश होता. पण, एका पाकिस्तानी नागरिकानं चोप्राच्या त्या ट्विटवरून भारतीय संघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. चोप्रानेही त्याला जशाच तसे उत्तर देताना चांगलेच सुनावले.
अॅलिसा हिली ( ७५) आणि बेथ मूनी ( ७८*) यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना १८५ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात भारतीय महिलांना दडपणाखाली चांगला खेळ करता आला नाही आणि भारताचे सर्व फलंदाज ९९ धावांत तंबूत परतले. ऑस्ट्रेलियानं २०१०, २०१२, २०१४, २०१८ आणि २०२० असा पाचव्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याचा पराक्रम केला. अॅलिसा हिलीला सामन्यातील, तर बेथ मूनीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
आकाश चोप्रानं ट्विट केलं की,''भारताने या स्पर्धेत केवळ एकच पराभव पत्करला आणि ऑस्ट्रेलियानेही. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध पराभूत झाले. स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत भारताने ऑसींना पराभूत केले आणि अंतिम सामन्यात ऑसींनी त्याची परतफेड केली. यालाच आयुष्य म्हणतात.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात दोनच भारतीय, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व!
...तर स्टार्कला एका सेकंदात 'जोरू का गुलाम' ठरवलं असतं, सानिया मिर्झाचा खोचक टोमणा
विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा 'झिंगाट' डान्स, पाहा Video
टीम इंडियात पुनरागमन? MS Dhoniसाठी अटी अन् शर्ती कायम, BCCIकडून स्पष्ट संकेत
टीम इंडियाच्या ओपनरने तीन दिवसांत अव्वल स्थान गमावले
आयपीएलचे सामने 'याचि देही याचि डोळा' पाहण्याचे दिवस विसरा, फ्रँचायझींचा मोठा निर्णय?
ऑस्ट्रेलियाशी 'शेकहँड', पण भारताला दूरूनच 'हाय'; द. आफ्रिकेचा 'आखडता हात'