इतक्या वर्षात क्रिकेटचे स्वरूपही बदलले आणि त्यामुळे नियमांत त्यानुसार सुधारणा केली गेली. यातील काही नियमांचं स्वागत झाले, तर काहींवरून वादही झाले. पण, क्रिकेटमधील अनेक नियम हे फलंदाजांसाठी पोषक अन् गोलंदाजांना मारक आहेत. त्यामुळे क्रिकेटमधील संतुलन बिघडलेलं पाहायला मिळत आहे. अशात भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा ( Aakash Chopra) यानं यू ट्यूब व्हिडीओवरून काही नियमांत बदल सुचवले आहेत.
हे बदल?
- 100 मीटर लांब षटकार खेचल्यास फलंदाजाला 8 धावा दिल्या गेल्या पाहिजेत
- आयसीसीनं जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार दोन नव्या चेंडूंचा वापर केला जातो, त्यामुळे जलदगती गोलंदाजाकडून रिव्हार्स स्विंगचा हक्क हिरावून घेतला जातो, तसेच फिरकीपटूंनाही नवा चेंडू वळवण्यात त्रास होतो. त्यामुळे जर गोलंदाजानं बाऊन्सर टाकल्यास आणि मैदानावरील पंचांनी तो वाईड बॉल घोषित केल्यास तो चेंडू बाऊन्सर म्हणून ग्राह्य धरू नये
- लेग बाय हा नियमच रद्द केला गेला पाहिजे. क्रिकेट हा बॅट आणि बॉल यांचा खेळ आहे. त्यामुळे पायाला लागून धाव द्यायला नको
- पंचांनी फलंदाजाला चूकीनं बाद दिले अन् चेंडू सीमारेषेपार गेला, परंतु फलंदाजाला डीआरएसमध्ये नाबाद जाहीर करण्यात आले, तर तो चेंडू डेड म्हणून जाहीर केला पाहिजे.
- जर फलंदाज 20 किंवा 50 षटकं खेळून काढू शकतात मग गोलंदाजांना 4 किंवा 10 षटकं फेकण्याचे बंधन का? गोलंदाज चांगली कामगिरी करत असल्यास त्याला अतिरिक्त षटक टाकायला दिले गेले पाहिजे
- एखादा संघ वेळेत षटक पूर्ण करू शकत नसेल तर दोन्ही संघांना शिक्षा व्हायला हवं. ती शिक्षा म्हणजे 30 यार्डाच्या आत एक अतिरिक्त खेळाडू उभा करण्याची
- यष्टींवरील LED lights पडल्या नाही तरी फलंदाजाला बाद दिले गेले पाहिजे.
- मैदानावरील पंचांकडून दिला जाणारा सॉफ्ट सिग्नल हा प्रकार बंद केला गेला पाहिजे. सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाचा पाय लागलाय की नाही हे त्याला कसे कळणार
- प्रत्येक निर्णय घेताना मैदानावरील पंचांना तिसऱ्या पंचांचा सल्ला घेता यायला पाहिजे.